भारत-नेपाळ सीमेवर कारवाई; व्हिसा नसल्याने दोन विदेशी नागरिक अटकेत

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांचे तपास नेटवर्क अधिकच कठोर झाले आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागांतील तपास अजूनही सुरू आहे. उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये धाड सत्र सुरू आहे. स्फोट प्रकरणी काही डॉक्टरांना अटक झाली आहे. फरिदाबादच्या डॉ. शाहीन आणि लखनऊच्या डॉ. परवेझ यांना स्फोट प्रकरणाशी संबंध असल्याचे पुरावे हाती आले आहेत. या दोघांना अटक करण्यात आली आहे.


त्याचवेळी, भारत-नेपाळ सीमेवर एक मोठा घुसखोरीचा डाव पोलिसांनी उडवून लावला आहे. बहराइचमध्ये दोन ब्रिटिश नागरिकांना अटक करण्यात आली आहे, ज्यात एक ३५ वर्षीय पाकिस्तानी युवक आणि दुसरी ६१ वर्षीय महिला, ब्रिटिश नागरिक असून ती मूळची भारतीय आहे. यांना भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.


शनिवारी सकाळी १० वाजता नेपाळगंजहून रुपैडिहाला प्रवास करणाऱ्या दोघांना थांबवण्यात आले आणि त्यांची कागदपत्रे तपासली गेली. त्यावेळी यांच्याकडे भारतात प्रवेश करण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्रे आढळली नाहीत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली गेली. या दोघांवरही भारतीय सीमेत अनधिकृतपणे प्रवेश करण्याचा आरोप ठेवला आहे आणि त्यांना बहराइच न्यायालयात हजर करण्यात आले आहे, असे रुपैडिहा पोलिस स्टेशनचे अधिकारी रमेश सिंह रावत म्हणाले.


अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्तींची ओळख पटली असून, ६१ वर्षीय सुमित्रा शकील ओलिव्हिया, ज्या कर्नाटकमधील उडुपी येथील आहे आणि ब्रिटिश पासपोर्ट धारक आहेत, त्याचा सध्याचा पत्ता ग्लुसेस्टर, युनायटेड किंग्डम आहे. हे दोघेही पाकिस्तानी हसन अम्मान सलीम याच्याशी संपर्कात आहेत. पुढील कारवाईसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.


दिल्लीतील स्फोटाशी संबंधित तपास वेगाने पुढे जात आहे आणि त्यामध्ये युनायटेड किंग्डम आणि पाकिस्तानमधील नागरिकांचा समावेश असल्याने तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय पातळीवरही कार्यरत आहेत. आतापर्यंत काही महत्त्वपूर्ण माहिती उघडकीस आलेली आहे, परंतु याची तपासणी सुरू आहे.

Comments
Add Comment

छत्तीसगडमधील सुकमात चकमक, तीन नक्षलवादी ठार

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमाच्या जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन माओवादी

दहशतवादी उमरच्या घरात होता बॉम्ब निर्मितीचा कारखाना

फरिदाबाद : दिल्ली कार स्फोट आणि दहशतवादी उमर यांच्याबाबत नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. स्फोट घडवणाऱ्या

तीन दिवसांत 28 काळवीटांचा मृत्यू; कर्नाटक प्राणीसंग्रहालयावर संशयाचे सावट

कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर राणी चेन्नम्मा प्राणीसंग्रहालयात गेल्या तीन दिवसांत तब्बल 28 काळवीटांचा

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०