मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा (Net Loss) झाला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ५१ कोटी नफ्याच्या तुलनेत यंदा तिमाहीत ३४८ कोटीचा निव्वळ तोटा झाला आहे. बँकेच्या प्रोव्हीजनिंगमध्ये वाढ झाली असून बँकेने यंदा विना तारण कर्ज वाटपात कपात केल्याने बँकेच्या ताळेबंदीत बँकेला नुकसान झाले आहे. तसेच बँकेच्या एकूण कामकाजातून मिळणाऱ्या उत्पन्नात (Income from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तुलनेत १०८ कोटींवरून ९३ कोटींवर घसरण झाली आहे. बँकेच्या असेट क्वालिटीतही घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थूल एनपीए (Gross Non Performing Assets NPA) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३.८८% तुलनेत यंदा तिमाहीत १२.४२% घसरण झाली असून निव्वळ एनपीएत (Net Non Performing Assets NPA) इयर ऑन इयर बेसिसवर ०.८९% वरून ५.०२% घसरण झाली आहे. डेट टू इक्विटी गुणोत्तरात (Debt to Equity Ratio) गेल्या वर्षीच्या तुलनेतील ०.६४% वरून घसरण होऊन ते या तिमाहीत ०.८३% वर पोहोचले आहे.
बँकेच्या सीएआर गुणोत्तरातही घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या सीएआर (Capital Adequacy Ratio CAR) २२.४३% वरून या तिमाहीत १७.२१% घसरण झाली आहे. तथापि ठेवींमध्ये (Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर १०% वाढ होऊन ती २१४४७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. किरकोळ मुदत ठेवींमध्ये ती २८.८% वाढ झाली आहे .यासह (करंट अकाऊंट सेविंग अकाऊंट कासा CASA) ठेवींमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १७.४% वाढ झाली त्यामुळे CASA प्रमाण २०.९% पर्यंत वाढले आहे.या निकालावर भाष्य करताना,'गृहनिर्माण आणि एमएसएमई कर्जांसारख्या सुरक्षित उत्पादनांमध्ये उत्पन्न ऑप्टिमायझेशन आणि दीर्घकालीन मालमत्तेच्या गुणवत्तेचे रक्षण करण्यासाठी सूक्ष्म-बँकिंगमध्ये कडक क्रेडिट नियमांचा उल्लेख करून सीईओ गोविंद सिंग म्हणाले आहेत की,ही तिमाही लवचिकता निर्माण करण्याबद्दल होती.'
माहितीनुसार, बँकेचा क्रेडिट-डिपॉझिट गुणोत्तर मात्र ७८.८% पर्यंत सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षीच्या ९३% वरून तो कमी झाला आहे.उत्कर्ष एसएफबीने त्यांच्या 'उत्कर्ष २.०' परिवर्तन मोहिम कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञानात सुरू असलेल्या गुंतवणुकीवर आणि टियर-१ भांडवल वाढवण्यासाठी नोव्हेंबरमध्ये ९५० कोटी राइट्स इश्यूनंतर मजबूत भांडवली स्थितीवरही भाष्य केले आहे. निकालानुसार, बँकेने दुसऱ्या तिमाहीत ३ कोटींचा प्री-प्रोव्हिजन ऑपरेटिंग तोटा नोंदवला आहे तर बँकेला गेल्या वर्षी २७६ कोटींचा नफा झाला होता.