ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या प्राणप्रतिष्ठा विधीनंतर हे मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी दर्शनासाठी खुले झाले असून, ठाण्यातील नवे अध्यात्मिक केंद्र म्हणून या मंदिराकडे पाहिले जात आहे. मुंबई महानगर प्रदेशातील हे सर्वात मोठे त्रिमंदिर मानले जात आहे.


ठाणे पश्चिमेकडील बाळकूम–साकेत रोड परिसरात सुमारे १.५ एकर क्षेत्रफळावर या त्रिमंदिराची उभारणी करण्यात आली आहे. महावीर जैन ट्रस्ट आणि दादा भगवान फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून हे मंदिर साकारले असून, धार्मिक समन्वय आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.


या त्रिमंदिरात एकाच व्यासपीठावर विविध धर्मांचे आराध्य दैवत विराजमान करण्यात आले आहेत. यामध्ये *जैन धर्माचे श्री सीमांधर स्वामी, शैव धर्माचे भगवान शिव, तसेच वैष्णव परंपरेतील भगवान कृष्ण यांच्यासह एकूण २५ पूजनीय देवतांची स्थापना करण्यात आली आहे. विविध धर्मांमधील निपक्षपातीपणा आणि समतेची भावना जपण्याचा प्रयत्न या मंदिररचनेतून दिसून येतो.


मंदिराच्या स्थापत्यशैलीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. हे मंदिर जयपूर येथून आणलेल्या पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बांधण्यात आले असून, त्याची कलात्मक रचना भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिरातील प्रमुख आकर्षण असलेल्या श्री सीमांधर स्वामी यांच्या मूर्तीची उंची सुमारे १३ फूट असून, तिचे वजन अंदाजे १८ हजार किलो असल्याची माहिती देण्यात आली आहे.


हे त्रिमंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून सामाजिक समता, धार्मिक सलोखा आणि अध्यात्मिक शांततेचे प्रतीक आहे. मंदिर सुरू झाल्याने ठाणे शहरातील भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, पुढील काळात हे ठिकाण अध्यात्मिक पर्यटनाचेही महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

Comments
Add Comment

Instant Sweet Recipes for Festivals : सणासुदीच्या दिवसात घरच्या घरी बनवा या इन्स्टंट मिठाईचे प्रकार; कमी वेळात तयार होईल गोड मेजवानी!

मुंबई : सणासुदीचे दिवस सुरू झाले की घरात गोडधोड पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. गणेशोत्सव, गौरी-गणपती, नवरात्र

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Self Improvement : तुम्ही कोणाचंच वाईट करत नाही, तरीही लोक तुम्हाला एकटं पाडतात? 'या' चुका ठरतात कारणीभूत

तुम्ही कोणाचं वाईट करत नसतानाही लोक तुमच्यापासून दुरावत असतील, तर त्याला तुमच्या नकळत

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Vishwa Hindu Parishad : दुर्गापूजा मंडपांमध्ये मांसाहारी पदार्थ टाळण्याचे विहिंपचे आवाहन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) पूजा आयोजकांसाठी