'इंदुरीकर तुम्ही प्रबोधनकार, कीर्तनकार नसून कॉमेडियन आहात. दुसऱ्यांना सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' या शब्दात तृप्ती देसाई यांनी किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका केली आहे. 'माझ्याशी मीडियासमोर जाहीर चर्चेसाठी तयार व्हा... तारीख, वेळ आणि ठिकाण तुम्हीच सांगा'; या शब्दात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी किर्तनकार इंदुरीकर महाराज यांना ओपन चॅलेंज दिले आहे. तृप्ती देसाईंच्या या आव्हानाला इंदुरीकर महाराज यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही.