'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निवेदिता सराफ यांना हा पुरस्कार त्यांचे पती आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी, मनोगत व्यक्त करताना 'मी कट्टर भाजप समर्थक' असल्याने बिहार मधील भाजपाच्या विजयचा आनंद झाल्याचे निवेदिता सराफ म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.


गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या की, "आजचा हा क्षण माझ्यासाठी खूपच भावनिक आहे. मी खरंच मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. ज्यांच्याकडून पुरस्कार मिळाला ती व्यक्ती माझे गुरु, माझे पती, आज मी जी काही आहे, ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे. त्यांच्या हस्ते तुम्ही मला हा पुरस्कार दिलात, हे तुम्हाला सुचलं त्यासाठी मनःपूर्वक आभार." पुढे त्या म्हणाल्या, "बिहारबद्दल खूप खूप अभिनंदन, मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच अभिमान वाटत आहे."



बालनाट्याबाबत सांगताना निवेदिता सराफ म्हणाल्या, "माझ्या आयुष्याची सुरुवात बालनाट्यातून झाली. सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून मी कामाला सुरुवात केली. सुधाताईंनी स्टेजवर उभं राहायला शिकवलं. सगळेच क्रिकेटच्या शिबिराला गेल्यावर सचिन तेंडुलकर बनत नाहीत, आणि सगळेच गाणं शिकायला लागल्यावर सोनू निगम बनत नाहीत. पण चांगले श्रोते-प्रेक्षक बनतात. यामुळे तुमचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी मदत होते."


गंधार बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यावर्षी गंधार गौरव पुरस्काराचे दहावे वर्षे होते. हा पुरस्कार सोहळा शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला असून यावर्षी या पुरस्काराच्या मानकरी अभिनेत्री निवेदिता सराफ ठरल्या. या पुरस्कारावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर, लेखक अभिजित पानसे, अभिनेते विजय पाटकर, राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ढवळ, दिग्दर्शक निर्माते मंगेश देसाई, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, विलास ठुसे, गंधारचे संस्थापक मंदार टिल्लू यांची उपस्थिती होती.

Comments
Add Comment

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक पिढ्यांना भुरळ घालणाऱ्या सुवर्णकाळातील दिग्गज