'सनई चौघडे' मध्ये पहिल्यांदाच आईची भूमिका साकारणार अदिती सारंगधर

मुंबई : ‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘तेजस्विनी खानोलकर’ हे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेबद्दल अदितीने मनमोकळ्या गप्पा मारल्या. "मी सनई चौघडे मालिकेत तेजस्विनी खानोलकर ची व्यक्तीरेखा साकारतेय. नाव जस भारदस्त आहे तशीच माझी व्यक्तीरेखा आहे. माझ्या सुदैवाने मला नेहमीच छान भारदस्त भूमिका मिळालेल्या आहेत. तेजस्विनीच्या मनात बरेच वर्षांपासून अनेक गोष्टी आहेत. तिने खूप सहन केलेल आहे खूप काही भोगलेल आहे, अनुभवलेलं आहे. बऱ्याच गोष्टीने तिच्या मनावर परिणाम केलेला आहे. दिसायला जे जस दिसत ते तस मुळात नसत, तशीच माझी व्यक्तीरेखा आहे. ती आपल्या कुटुंबासाठी जीव ओवाळून टाकणारी आहे, आपल्या मुलांवर अत्यंत प्रेम करणारी आहे. झी मराठी वर मी नायिकेची, खलनायिकेची भूमिका केली आहे पण आता पहिल्यांदा आता आईची भूमिका करणार आहे. मला झी मराठीने नेहमीच अशा सशक्त व्यक्तीरेखा दिलेल्या आहेत.


या भूमिकेसाठी माझी निवड कशी झाली हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे, कारण आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुरु आहेत, बऱ्याच नाटकांचं वाचन चालू आहे, मी आता स्वतः आई असल्यामुळे मला सशक्त भूमिका हवी होती. तेजस्विनीची भूमिका अगदी तशीच आहे, जिचं स्वतःच काही म्हणणं आहे, तिच्या भोवती बऱ्याच गोष्टी फिरत आहेत. खर सांगायचं तर आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती. पण काही गोष्टी तुम्ही स्वीकारता, हल्ली टेलिव्हिजन मध्येही चांगले बदल घडून येत आहेत. म्ह्णून मी ह्या सगळ्याचा खोलवर विचार करून माझ्या तत्वांचा सांभाळ करत, हि भूमिका स्वीकारली. अधिक सांगायच झालं तर राजू सावंत डायरेक्टर -प्रोड्युसर ह्यांच्या सोबत मला मनापासून काम करायचं होत. मला असं वाटत कि चांगल्या कलाकाराच्या वाट्याला चांगले दिग्दर्शक मिळणं आणि चांगल्या दिगदर्शकाला चांगले कलाकार मिळणं हि भाग्याची गोष्ट असते. आधीच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका कशी वेगळी आहे हे सांगायचे झाले तर 'वादळवाट' मधली रमा चौधरी, 'लक्ष' मधली सलोनी देशमुख 'हम बने तुम बने' मधली तुलीका 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधली मालविका, आणि आता 'सनई चौघडे' मधली तेजस्विनी प्रत्येक भूमिकेचे काहीतरी कंगोरे असतात प्रत्येक भूमिकेची काहीतरी खास वेगळेपण असतं, दिसण्यामध्ये वागण्यामध्ये वावरण्यामध्ये. मी अनेक मालिका केलेल्या आहेत तर मी नक्की म्हणणे लेखका पासून प्रत्येकानेच माझ्या भूमिकेतलं वेगळे पण जपलेलं आहे. आणि त्याच खास वेगळेपणासोबत प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी मी माझ्या परीने खुप प्रयत्न केलेला आहे.

सहकलाकारांशी मैत्री म्हणजे मेघनाला मी पूर्वी पासून ओळखते त्यामुळे ती तर आहेच माझी खास, तसंच मी मनस्वी जी प्रोड्युसर आहे ती फार गोड मुलगी आहे तिला ओळखते. तसच बॅक स्टेज काम करणाऱ्यांशी माझं चांगल आहे त्यांना मी ओळखते, सर्व युनिट मधल्याना मी ओळखते त्यामुळे मला थोडं सुखद वाटल कि माझ्या लोकांमध्येच मी काम करणार आहे. आणि मला असं वाटत कि सहकालाकारांशी काम करता करता मैत्री होतेच, पण कलाकारांनी आपल्या युनिटला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे. काम करता करता कलाकारांची मैत्री होऊन जाते, पण युनिटचा आनंद ही तेवढा महत्वाचा असतो. मला युनिट सोबत वेळ घालवायला जेवायला बसायला फार आवडत. तसंच नवीन कलाकारांसोबत काम करताना नव्या ऊर्जेत काम करायला मला खुप आवडत ती नवीन ऊर्जा मला मिळते ती ऊर्जा आमच्या टीम मध्ये आहे.”

Comments
Add Comment

Actor Satendra Soni : 'लापता लेडीज' फेम सत्येंद्र सोनीचा धक्कादायक आरोप! मानधन मागितल्यावर मारहाण, हॉटेलमधून...

मुंबई : 'लापता लेडीज' चित्रपटातील 'छोटू' या भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता सत्येंद्र सोनी (Actor Satendra Soni) सध्या एका

'Mirzapur: The Movie' : ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा टीझर इंटरनेटवर सुपरहिट! रिलीज होताच YouTube ट्रेंडिंगमध्ये #1

मुंबई : अखेर चाहत्यांची बहुप्रतीक्षित प्रतीक्षा संपली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार टीझर प्रदर्शित होताच

Rohit Shetty : रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! २० कोटींच्या खंडणीची मागणी; बिश्नोई गँगचं कनेक्शन तपासात

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Nivedita & Ashok Saraf : अशोक सराफांना लग्न करायचंच नव्हतं; सचिन पिळगांवकरांनी जमवली जोडी; सराफ जोडीच्या लग्नाची ही कहाणी अनेकांना माहिती नाही

Ashok Saraf & Nivedita Saraf Anniversary : मराठी कलाविश्वात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या लग्नाला आज ३७

Vithabai Narayangaonkar : जाणून घ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्याविषयी काही रंजक गोष्टी

मुंबई : तमाशा विश्वातील अजरामर नाव : विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांना महाराष्ट्राच्या 'तमाशा सम्राज्ञी'

Lock Upp 2 : 'लॉकअप २'मध्ये रंगणार सेलिब्रिटींचा थरार! १५ स्पर्धकांची संपूर्ण यादी आली समोर

'Lock Upp 2' : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'लॉकअप २ (Lock Upp) पुन्हा एकदा नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या पर्वाला