तब्बल १३ वर्षांनी अभिजीत सावंतने गायलं मराठी सिनेमासाठी गाणं, नवीन गाण्यातून वेगळीच झलक प्रेक्षकांसमोर

मुंबई: इंडियन आयडियल १ चा विजेता, बिग बॉस मराठी ५ चा रनर अप आणि लाखो मुलींची धडकन अभिजीत सावंत. हिंदीत मोहबते लुटाऊंगा तर मराठीत सर सुखाची श्रावणी या दोन्ही गाण्यांनी अभिजीतने प्रेक्षकांना वेड लावलंय. त्याने आतापर्यंत अनेक गाणी गायली पण या दोन गाण्यांसाठी अभिजीतची वेगळीच फॅन फॉलोविंग आहे. मंगलाष्टक वन्स मोअर या सिनेमातील 'सर सुखाची' हे गाणं अभिजीत सावंतने गायलं आणि एक ट्रेंड सेट केला. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आहे.


'सर सुखाची' या गाण्यानंतर अभिजीत सावंतने कोणत्याच मराठी सिनेमासाठी गाणं गायलं नाही. इतका चांगला गायक आजवर कुठे होता असा प्रश्न अनेकांना पडला होता. सर सुखाची या गाण्यानंतर तब्बल १३ वर्षांनी अभिजीत सावंतने मराठी सिनेमासाठी गाणं रेकॉर्ड केलं आहे.


२०२५ या वर्षात ट्रेंड सेटर ठरलेला गायक अभिजीत सावंत आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना बघायला मिळणार आहे. अगदी इंडियन आयडॉल ते ट्रेंड सेटर गायक म्हणून असलेली त्याची ओळख कायम प्रेक्षकांना काहीतरी नवीन गाणं देऊन जाते.


तब्बल १३ वर्षानी पुन्हा एकदा अभिजीत 'सखे गं साजणी' या मराठी चित्रपटाच टायटल ट्रॅक त्याने केलं आहे. सर सुखाची श्रावणी या सदाबहार गाण्यानंतर तो आता पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या गाण्यात अभिजीतची एक झलक देखील बघायला मिळत आहे.


सखे गं साजणी हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. गाण्याविषयी बोलताना अभिजीत सावंत म्हणाला, "चित्रपटासाठी गाणं करणं हे प्रत्येक गायकांच स्वप्नं असतं आणि अश्यातच ही संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. 'सखे गं साजणी' चित्रपटाचं टायटल ट्रॅक करायचं आहे हे समजलं तेव्हा पासून या गाण्याबद्दल मला सुद्धा उत्सुकता होती. गाणं गाऊन अभिनय करणं या दोन्ही गोष्टी या गाण्यात करायला मिळाल्या आहेत त्यामुळे हे गाणं अजून खास झालं आहे. प्रेक्षकांनी आजवर माझ्या प्रत्येक कलाकृतीला भरभरून प्रेम दिलं तेवढंच प्रेम प्रेक्षक या गाण्यासाठी देखील देतील अशी आशा आहे"

Comments
Add Comment

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत