प्रतिनिधी:अल्पावधीतच युजर्सला आकर्षित करून लोकप्रियता मिळवणारे झोहो कॉर्पोरेशनने नव्या फिचर्सची अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीचे नवे मेसेंजर अँप व व्हॉट्सॲपला तगडा स्पर्धक ठरत असलेले अरताई आता आणखी नव्या फिचरसह लवकरच बाजारात उतरणार आहे. माहितीनुसार, कंपनीने सर्वेसर्वा श्रीधर वेंबू यांनी एक्सवर याबद्दलची माहिती देत एंड टू एंड इन एन्क्रिप्शन सुविधा लवकरच बाजारात दाखल करणार आहे. प्रत्येक युजरचे वैयक्तिक चॅटिंग असो अथवा ग्रुपवरील संभाषण असो अरताई (Artai Messenger) प्रत्येक युजरसाठी हे फिचर लागू करणार आहे अशी घोषणा कंपनीने केली. वेंबू यांनी कंपनी सध्या या फिचरवर काम करत असल्याने अद्याप ते फिचर लागू झालेले नाही. मात्र टेस्टिंग पूर्ण झाल्यावर ते ग्राहकांना रोलआऊट केले जाणार आहे असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
याशिवाय कंपनीच्या ६००० कर्मचाऱ्यांनी या फिचरची चाचपणी केली असल्याचे वेंबूनी नमूद केले आहे. रोलआउट एका-एक-एक चॅटने सुरू होणार असून त्यानंतर लवकरच ग्रुप संभाषणाला लागू होऊ शकते त्यामुळे आपले खासगी चॅटिंग या निमित्ताने सुरक्षित होणार आहेत हे अपग्रेड यापूर्वी व्हॉट्सअँपने ग्राहकांसाठी बाजारात आणले होते.
याविषयी नेमक्या शब्दात श्रीधर वेंबू आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहेत की,'अरट्टईवरील स्थिती: आम्ही पर्याय २ सह जाण्याचा निर्णय घेतला जो सिस्टम-व्यापी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन अनिवार्य आहे (एक-एक संदेशांपासून (End to End Personal Conversation) पासून सुरुवात करून आणि समुहावर (Group Conversations) हे नंतर लागू होईल. आम्हाला त्याभोवती काही पुनर्रचना करावी लागली आणि आम्हाला व्यापक चाचणी हवी होती कारण हा एक मोठा बदल आहे. आता कंपनीतील सुमारे ६००० लोकांकडून त्याची चाचणी घेतली जात आहे. आम्ही काही समस्या ओळखल्या आणि त्या सोडवल्या आहेत. आम्ही ओळखल्या गेलेल्या समस्या सोडवणाऱ्या नवीन बिल्डवर आणखी एक चाचणी करत आहोत.
जर सर्व काही व्यवस्थित झाले, तर आम्ही काही दिवसांत हे फिचर तैनात करण्याची योजना आखत आहोत. हे सर्वांसाठी सक्तीचे अपग्रेड असेल कारण हा एक मोठा बदल आहे दरम्यान, तुम्ही अॅप अपग्रेड करू शकता आणि त्यात आधीच अनिवार्य e2e एन्क्रिप्शनसाठी कोड असला तरी, आम्ही ते सक्षम करेपर्यंत ते काम करणार नाही आणि आम्ही ते दुसऱ्या चाचणी फेरीनंतर करू. अॅप आता अधिक जलद आणि आकर्षक झाले आहे जे तुम्ही अनुभवू शकता.तुमच्या संयमाबद्दल धन्यवाद.' असे म्हटले आहे.