‘मी संसार माझा ...’ मालिकेतून सुरू होणार अनुप्रियाची गोष्ट

‘सन मराठी’वर ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी, कोणतीच अपेक्षा न ठेवता नात्यांना जपणारी अनुप्रिया १ डिसेंबर पासून रोज रात्री ९:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमोमध्ये उत्कृष्ट कलाकारांची  मांदियाळी पाहायला मिळत आहे. मुख्य अभिनेत्री दीप्ती केतकरसह, हरीश दुधाडे, आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, संदीप गायकवाड आणि दीप्ती सोनावणे मालिकेची रंगत वाढवण्यासाठी सज्ज आहेत. मालिकेचा विषय प्रत्येक गृहिणीला आपलसं करून घेणारा आहे. याचसह मालिकेत मायलेकीचं घट्ट नातं पाहायला मिळतंय. 'जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं' या सुंदर तत्त्वावर मालिका आधारित आहे.


मालिकेत अनुप्रिया ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीप्ती केतकर भूमिकेविषयी सांगताना म्हणाल्या की, "मी या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. काही काळ मी अश्याच भूमिकेची वाट पाहत होते. या मालिकेतील अनुप्रिया अगदी तशीच आहे. स्वतःच्या कुटुंबावर असलेलं प्रेम, त्यांची काळजी या सगळ्यात अनुप्रिया तिची स्वप्नं बाजूला ठेवून कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट आवडीने करते. या गोष्टीचा तिला कुठेच त्रास होत नाही. अनुप्रिया आणि माझ्यात एकच फरक आहे की, मला माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. अनुप्रियाच्या बाबतीत तसं नाहीये. या मालिकेसाठी माझ्या सासूबाई, नवरा व मुलगी माझ्यापेक्षा जास्त खूश आहेत. सासूबाईंनी मला ठणकावून सांगितलं आहे की, आता पूर्णपणे कामाकडे लक्ष दे आमची काळजी करू नकोस."


या पुढे दीप्ती केतकर म्हणाल्या की, "माझ्यासाठी मुलीकडून "आई तू खूप छान काम करते" हे वाक्य ऐकणं कोणत्याही अॅवॉर्डपेक्षा मोठं आहे. मालिकेत अनुप्रियाची मुलगीही तिच्या मागे खंबीर उभी असते. ही मालिका प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल ही खात्री आहे. प्रत्येक मालिकेनंतर मी कुटुंबासाठी ब्रेक घेत असते, पण आता मी थांबणार नाही. प्रेक्षकांना इतकंच सांगेन की, अनुप्रियाला भरभरून प्रेम व आशीर्वाद द्या."

Comments
Add Comment

‘असंभव’ वाटणारा थरार

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  अभिनय करता करता एखाद्या अभिनेत्याला दिग्दर्शक व्हावस वाटणं आपण समजू शकतो; परंतु

‘अ परफेक्ट मर्डर’मध्ये दीप्ती भागवतचा रहस्यमय प्रवास!

“हिचकॉक म्हणजे थ्रिलचा राजा! त्यांच्या कलाकृतींमध्ये असलेला गूढपणा, रोमांच आणि भीतीचा सूक्ष्म खेळ नेहमीच मला

प्रयोग क्रमांक १३३३३... आणि प्रशांत दामले...!

राजरंग : राज चिंचणकर (अरे, हाय काय आणि नाय काय...) मराठी रंगभूमीवरचे ‘विक्रमादित्य’ म्हणून सार्थ ओळख असलेले

दिग्दर्शक देखील उपेक्षितच असतो! (भाग दोन)

भालचंद्र कुबल : पाचवा वेद मागच्या लेखावरून पुढे जाताना दिग्दर्शक हा नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेत उपेक्षितच

नाटकाच्या प्रयोगासाठी ‘उदकशांत’ करताना...

राजरंग : राज चिंचणकर नाटक हे नाटक असते आणि नाटकांच्या बाबतीत व्यावसायिक व प्रायोगिक असा भेदभाव केला जाऊ नये, अशी

‘गोदावरी’तील समावेश कलाटणी देणारा

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल गौरी नलावडे या अभिनेत्रीचा ‘वडा पाव’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. गौरीचे शालेय