शिवसेनेकडून निवडणूक प्रभारींची घोषणा

सिंधुदुर्गची आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकरांवर जबाबदारी


मुंबई  : आगामी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेकडून निवडणूक प्रभारींची गुरुवारी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. पक्षाने राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली असून यात शिवसेना मंत्री खासदार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी खास रणनीती तयार केल्याचे या यादीतून दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाकडून निवडणूक प्रभारी जाहीर करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष आणि महायुतीला कोणताही धक्का बसू नये, यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन करत राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या प्रभारींना स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांशी समन्वय साधून पक्षाची धोरणे, विकासकामे आणि महायुती सरकारची लोकहिताची कामे आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


सिंधुदुर्गसाठी आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, रत्नागिरीसाठी मंत्री उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, मंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, रायगडसाठी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, पुण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, आमदार शरद सोनावणे, अहिल्यानगरसाठी आमदार विठ्ठल लंगे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, धुळेसाठी आमदार मंजुळा गावित, जळगावसाठी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत सोनावणे, आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार गिरीश चौधरी आणि नाशिकसाठी आमदार सुहास कांदे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार धनराज म्हाले, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते विजय करंजकर यांच्यावर निवडणूक प्रभारींची जबाबदारी सोपविली आहे.

Comments
Add Comment

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ या पुरस्कारासाठी निवड

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

लक्ष्य सेनची जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू

नाशिक जिल्हा परिषदेची नूतन इमारत गतिमान कारभारासाठी उपयुक्त ठरेल : मुख्यमंत्री

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी