मुंबईतील २७ टक्केच नागरिक साखरेपासून राहतात लांब, व्यायामचा अभाव आणि चुकीचा आहारामुळे असंसर्गजन्य आजारांना दिले जाते निमंत्रण

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून 'मीठ - साखर अभियान २०२५' जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने केलेल्या एका सर्वेक्षण पाहणीत असे आढळून आले की, फक्त २७ टक्के मुंबईकरांना साखरेच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम माहीत होते. मुंबईसारख्या महानगरामध्ये नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे मधुमेह, उच्चरक्तदाब, ह्दयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.


विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना योग्य व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास ते नागरिकांच्या जीवनशैलीत आवश्यक तो सकारात्मक बदल घडेल. मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. मधुमेहाचा प्रादुर्भाव रोखण्याचसाठी नागरिकांनी ‘हेल्दी कॅम्पस अभियान’ यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जागतिक मधुमेह दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे.


जागतिक आरोग्या संघटनेनुसार ३ पैकी १ एक व्यक्ति असंसर्ग आजाराने पीडित असतो. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामागील मुख्य कारणे म्हणजे नागरीकरण, बसून राहण्याची जीवनशैली, अयोग्य आहाराच्या सवयी इत्यादी होत. तसेच मुंबईमध्ये एकूण १५.६ % मधुमेहपूर्व व्यक्ती आढळले आहेत.


आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्याअंदाजानुसार, भारतामध्ये सुमारे १,२८,५०० बालक आणि किशोरवयीन मुले टाइप १ मधुमेहाने (डायबिटीज) प्रभावित आहेत. जागतिक आरोग्य संघटना व महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ टक्के (१८-६९ वयोगटात) व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले आढळले आहे.



'हेल्दी कॅम्पस उपक्रम'


'हेल्दी कॅम्पस उपक्रम' हा मीठ-साखर अभियान म्हणून राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत मुंबईतील सुमारे १०० हून आधिक महाविद्यालयांमध्ये 'हेल्दी खा, स्वस्थ रहा, मस्त रहा' या घोषवाक्याबाबत जनजागृती करण्यात येईल. आरोग्यदायी कँटिन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जाईल. ‘राष्ट्रीय छात्र सेवा' आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांद्वारे 'हेल्दी फूड फेस्ट’ स्पर्धा आणि डिजिटल मोहीमेचे आयोजन करण्यात येणार आहे. आहार तज्ज्ञांद्वारे विद्यार्थ्यांना पोषण दूत म्हणून प्रशिक्षित केले जाईल. तसेच स्वयंपाकी, पाककला तज्ज्ञ आणि महिला स्वयंसेविका व समुदाय प्रतिनिधी यांच्या सहकार्याने कमी मीठ - साखरयुक्त पाककृती, आरोग्यदायी खाद्यपदार्थ (मेन्यू) विकसित करून समाजात आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृती केली जाईल.

Comments
Add Comment

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

करिअर : सुरेश वांदिले डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांना पूरपरिस्थितीत बचावाचे प्रशिक्षण, ऍडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यू प्रशिक्षणाकरता नेमली संस्था

पाण्यात आणि उंचावर अडकलेल्यांना अत्याधुनिक पध्दतीने वाचवण्यासाठी करणार प्रशिक्षित मुंबई (खास प्रतिनिधी):

पवई तलावातील जलपर्णी वाढता वाढता वाढे, कंत्राटदाराला मिळाला १ कोटी रुपयांचा बोनस

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील पवई तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील जलपर्णी वनस्पती, तरंगणा-या तसेच जमिनीतून