Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या नावाखाली क्यूआर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे गोळा करण्याचा आणि ते विदेशात वळवण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेले १० लाख रुपये विदेशात वळवण्यात आले आहेत. या प्रकरणी एटीएस (ATS) ने तातडीने कारवाई करत सय्यद बाबर अली सय्यद महमूद अली नावाच्या आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणा सर्व पातळीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर, एटीएसकडून छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मध्ये शोधमोहीम (Search Operation) सुरू करण्यात आली आहे. गाझा मदतीच्या नावाखाली झालेल्या या गैरप्रकारामुळे आणि दिल्ली स्फोटामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.



पॅलेस्टाईन मदतीच्या नावाखाली बनावट QR कोडचा वापर


गाझा-पॅलेस्टाईन युद्धातील नागरिकांना मदतीच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करून निधी गोळा करण्याच्या प्रकरणात एटीएसच्या (ATS) तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने नागरिकांना भावनिक आवाहन करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपीने फसवणूक करण्यासाठी दोन संस्थांचा वापर केला ज्यात आरोपीने 'अहमद राजा फाउंडेशन' या नोंदणी नसलेल्या (Unregistered) संस्थेच्या नावाने एक बनावट QR कोड तयार केला. या QR कोडद्वारे नागरिकांना भावनिक साद घालून पैशांची मागणी करण्यात आली. याचबरोबर, त्याने 'राजा एम्पॉवरमेंट फाउंडेशन' या नोंदणीकृत (Registered) संस्थेचा आधार घेऊनही निधी जमा केला. या दोन्ही मार्गांनी जमा केलेले एकूण १० लाख २४ हजार रुपये आरोपीने थेट स्वतःच्या खात्यात वळवून घेतले आहेत. एटीएसच्या या तपासामुळे मदतीच्या नावाखाली सुरू असलेल्या या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला असून, नागरिकांनी ऑनलाईन देणगी देताना अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.



'टेरर फंडिंग'च्या दिशेने एटीएसचा तपास


एटीएसच्या तपासानुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी बाबर अली याने स्वतःच्या खात्यातील एकूण १० लाख २४ हजार २२० रुपये इतकी मोठी रक्कम एका आंतरराष्ट्रीय पोर्टलद्वारे विदेशात पाठवली आहे. आरोपीने ही रक्कम GOFUNDM.COM या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून परदेशात ट्रान्सफर केली. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गोळा केलेले पैसे थेट विदेशात पाठवल्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, ज्याचा तपास एटीएस करत आहे, ही मोठी रक्कम नेमकी कोणत्या उद्देशाने विदेशात पाठवण्यात आली? विदेशात पाठवलेल्या या पैशांचा कशा प्रकारे वापर करण्यात आला? या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी (Terror Funding) तर केला जात नाही ना? या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एटीएसचा तपास आता अधिक तीव्र झाला असून, या तपासातून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहाणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला पुणे : पुणे शहरात

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू