पिसे पांजरापूर येथे ९१० दशलक्ष लिटर प्रतीदिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणार, आता केंद्राची क्षमता होणार १८२० दशलक्ष लिटर

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धरणातून आलेल्या पाण्यावर भांडुप संकुल आणि पिसे पांजरापूर येथील जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. सध्या पिसे पांजरापूर येथे ४५५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र असून याठिकाणी आता आणखी ९१० दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे याठिकाणच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाची क्षमता आता अधिक वाढली जाणार आहे. या जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता प्रती दिन १८२० दशलक्ष लिटर एवढी होणार आहे. या जलशुध्दीकरण केंद्रातून पूर्व आणि पश्चिम उपनगराला पाणी पुरवठा केला जातो.


मुंबईला शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी १९७९ मध्ये म्हणजे ४६ वर्षांपूर्वी पिसे पांजरापूर येथे ४५५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दी करण उभारण्यात आले. परंतु जलशुध्दीकरण प्रक्रियेत जलवाहिनींची झीज झाल्याने तसेच जलप्रक्रिया केंद्राचे आयुष्यमान संपुष्टात आल्याने त्याची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भविष्यात पाणी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येवू नये म्हणून ते त्वरीत बदलण्यासाठी टप्पा एकमधील बॉम्बे १मधील जलप्रक्रिया केंद्र जुने असल्यामुळे याला बांधण्यास काही वर्षे लागणार असल्याने ९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन जलप्रक्रिया केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाणी पुरवठा प्रकल्प विभागाच्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या जलशुध्दीकरण केंद्राची बांधणी झाल्यानंतर जुना ४५५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचाे जलप्रक्रिया केंद्र बंद करण्यात येईल. नवीन बांधण्यात येणाऱ्या ९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन जलशुदीकरण केंद्राीतील उर्वरीत ४५५ दशलक्षलिटरची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठीही वापरली जावू शकते.



अशाप्रकारे पिसे पांजरापूर संकुलाची एकूण क्षमता सध्याच्या १३६५ वरून १८२० दशलक्ष लिटर प्रतिदिन पर्यंत वाढवली जाईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन जलशुध्दीकरण केंद्राची संकल्पना बॅक वॉश पुनर्वापर प्रवाहासह सामान्य जलप्रवाह क्षमता ९१० दशलक्ष लिटर प्रती दिन असेल. जलशुध्दीकरण केंद्र कमी जागेत विकसित करण्यासाठी प्रगत अशा हाय रेट ग्रॅव्हिटी फिल्ट्रेशनसह ऍडवान्स कॉग्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, हे काम पुढील चार वर्षांत पूर्ण केले जाईल आण पुढील १५ वर्षांची देखभाल संबंधित कंत्राटदार संस्थेवर राहील. येथील ७.६ हेक्टर जागेत नवीन ९१० क्षमतेचा नवीन जलप्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी वेलस्पन एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांस ४४६३.६३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. कोटी रुपये

Comments
Add Comment

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर

उद्या आणि परवा मुंबईत पाणीबाणी!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८००

महाराष्ट्रात केवळ मोजक्या पक्षांकडे राखीव निवडणूक चिन्ह

राष्ट्रीय, राज्यस्तरीय वगळता छोट्या पक्षांची होणार दमछाक मुंबई  : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

माहिममध्ये उबाठाकडे मनसेची खुल्या प्रभागांची मागणी, पाच पैंकी तीन खुले प्रभाग आपल्याकडे घेण्याचा मनसेचा विचार

मुंबई (सचिन धानजी):  मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर आता

मुंबईतील अनधिकृत बांधकामांसाठी तक्रारींसाठी डॅशबोर्ड, महापालिकेने संस्थेची केली नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील अतिक्रमण हटवण्यासाठी आता महापालिकेच्यावतीने ट्रॅकींग सिस्टीम राबवण्यात येणार

महानगरपालिका शाळांतील दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड

मुंबई (खास प्रतिनिधी): नुकत्याच पार पडलेल्या शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांतील