दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील वॉर्ड क्रमांक १, जो गेली अनेक वर्ष घोसाळकर कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जात होता, यावेळी त्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. कारण, नव्या प्रभागरचनेनुसार हा वॉर्ड महिला ओबीसी घोषित झाला आहे.


या वॉर्डमध्ये २०१२ ते २०१७ दरम्यान अभिषेक घोसाळकर नगरसेवक होते, तर २०१७ पासून तेजस्वी घोसाळकर नगरसेविका म्हणून काम पाहत होत्या. याआधी विनोद घोसाळकर दहिसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत होते. त्यामुळे या परिसरात घोसाळकर कुटुंबाचे वर्चस्व होते. मात्र, नव्या आरक्षणामुळे या कुटुंबाला वॉर्ड क्रमांक १ मधून उमेदवारी घेता येणार नाही.


तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, “वॉर्ड क्रमांक १ माझ्या कुटुंबाशी भावनिकरित्या जोडलेला आहे. मात्र, या वेळी आरक्षणामुळे तिथून निवडणूक लढवणे शक्य नाही, ही खंत आहे. आता वॉर्ड क्रमांक ७, ८ किंवा २ मधून संधी मिळाल्यास लढण्याची तयारी आहे.”


तेजस्वी या शिउबाठाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई तर माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिलं आहे, “माझ्या वॉर्डमध्ये ओबीसी महिला आरक्षण लागू झाल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. ही गोष्ट वैयक्तिकदृष्ट्या खूप वेदनादायक आहे.”


सध्या दहिसर विधानसभा मतदारसंघातील बहुतांश वॉर्डांवर भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आहेत. येत्या निवडणुकीत या मतदारसंघात कोण बाजी मारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

MIM मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार, एवढे उमेदवार रिंगणात उतरवणार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. हे आरक्षण जाहीर होऊन दोन दिवस होत नाहीत तोच

Priyanka Chopra : अहा! हातात बंदूक अन् पायात कोल्हापुरी, काशीबाईनंतर प्रियांका चोप्राच्या मराठमोळ्या लूकने घातला धुमाकूळ!

मुंबई : बॉलिवूडची ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आता तिच्या आगामी आणि बहुप्रतिक्षित

मुंबई लोकलमध्ये फुकट प्रवासाचा नवा फंडा; UTS अॅपचा गैरवापर करून रेल्वेला लावला जातोय गंडा?

मुंबई : मुंबई लोकल म्हणजे सामान्य प्रवाशांसाठी दररोजचा प्रवासाचा अविभाज्य भाग. मात्र काही हुशार प्रवाशांनी या

मुंबई लोकलमध्ये घृणास्पद कृत्य; महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चगेट-बोरिवली

Sunny Deol Angry On Paparazzi : 'तुम्हाला लाज वाटत नाही का?' धर्मेंद्र यांच्या दुःखात व्हिडिओ बनवणाऱ्या पॅपाराझींवर सनी देओल भडकला; आधी हात जोडले, मग चांगलेच झापले!

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती सध्या नाजुक असून, त्यांच्या