महानगरपालिका शाळांतील दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड

मुंबई (खास प्रतिनिधी): नुकत्याच पार पडलेल्या शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी कुस्ती, मल्लखांब खेळांमध्ये चकमदार कामगिरी बजावत राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. मालाड हिंदी माध्यमिक शाळेतील अंकुश यादव (कुस्ती), शीव (सायन) मुंबई पब्लिक स्कूलमधील राजू वर्मा (मल्लखांब) या दोन विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर विजय मिळवित राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवेश मिळविला आहे. यासोबतच चकाला हिंदी माध्यमिक शाळेतील सुजीत बिंद (मुष्टियुद्ध) या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला.


महानगरपालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासह त्यांच्या शारीरिक विकासासाठी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले जाते. या स्पर्धांतील सहभागामुळे विद्यार्थ्यांमधून नेतृत्वगुण आणि खिलाडू वृत्तीही जोपासली जाते.


मालाड हिंदी माध्यमिक शाळेतील अंकुश यादव या विद्यार्थ्यांने राज्य स्तरावर पार पडलेल्या १७ वर्ष वयोगटात कुस्ती स्पर्धेत विजय मिळविला. या विजयामुळे अंकुशची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. शीव (सायन) मुंबई पब्लिक स्कूलचा विद्यार्थी राजू वर्मा याने राज्य स्तरावर पार पडलेल्या १४ वर्ष वयोगटात मल्लखांब स्पर्धेत दाखविलेल्या प्रात्यक्षिकांमुळे त्याचीही राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. तसेच चकाला हिंदी माध्यमिक शाळेतील सुजीत बिंद या विद्यार्थ्यांने राष्ट्रीय स्तरावरील १४ वर्ष वयोगटात मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत सहभाग घेतला.



रग्बी संघाची हॅटट्रिक


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूलमधील रग्बी संघाने विभाग स्तरावर दाखविलेल्या सांघिक कौशल्यामुळे त्यांची सलग तिसऱयांदा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये महानगरपालिकेच्या डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूलमधील १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने रग्बी खेळात प्रथम क्रमांक मिळवत सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेत मजल मारली आहे. तसेच याच वयोगटातील मुलींच्या संघाची देखील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १७ वर्ष वयोगटात याच शाळेतील मुलींच्या संघाने विभाग स्तरावर विजय मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. या यशाबद्दल रग्बी संघाचे प्रशिक्षक ओमकार तळेकर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.








Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती