सिंहस्थ कुंभमेळा जगाच्या अध्यात्मिक नकाशावर भारताला अधोरेखित करणार

५,७५७ कोटी ८९ लाख रुपयांच्या विकासकामांचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन


नाशिक : ‘नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून, जगाच्या अध्यात्मिक नकाशावर भारताचे स्थान अधिक दृढ करणारा सोहळा ठरेल. राज्य सरकार नियोजनबद्ध आणि दर्जेदार तयारीसाठी कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी नाशिकमध्ये केले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या प्रचारासाठी ‘डिजिटल कुंभ’ ही नवी संकल्पना जाहीर केली आहे. याअंतर्गत सर्व माहिती डिजिटल माध्यमांद्वारे भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल ५,७५७ कोटी ८९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्यासाठी नाशिक शहर सज्ज झाले होते. या सिंहस्थ कुंभमेळ्यात १४०० एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. येथे देशभरातून येणाऱ्या साधुसंतांसाठी सर्व सोयीसुविधांसह निवास व्यवस्था केली जाईल.


नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला लक्षात घेऊन शासनाने अल्पकालीन आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा आणि साधुसंतांसाठी निवास व्यवस्था यांसह विविध सुविधा उभारण्यात येणार आहेत. एकूण ५,७५७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांमध्ये रस्ते, पूल, जलनिस्सारण, स्मार्ट सिटी प्रकल्प, वाहतूक सुधारणा, स्वच्छता योजना आणि नदी पुनरुज्जीवन यांचा समावेश आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, मंगेश चव्हाण, दिलीप बोरसे, राहुल ढिकले, तसेच वरिष्ठ अधिकारी शेखर सिंह, मनीषा खत्री, आयुष प्रसाद, दत्तात्रय कराळे, संदीप कर्णिक, भास्कर पाटील आदी उपस्थित होते.



नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नाशिकचा चेहरामोहरा बदलविण्याची मोठी संधी कुंभमेळ्यामुळे मिळाली आहे. या विकासकामांमुळे शहर स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक होईल. रामकुंड व गोदावरी नदी परिसरात स्वच्छता आणि पाणी शुद्धीकरण यावर विशेष भर देण्यात येईल. हा त्रिखंडी कुंभमेळा २२ महिन्यांचा असेल. लाखो भाविक व साधुसंतांच्या व्यवस्थेसाठी प्रशासनाने योजनेसह तयारी करणे आवश्यक आहे. प्रयागराज कुंभमेळ्यातील अनुभवाचा उपयोग आपण करणार आहोत. गर्दी नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्थेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. आज गोदाकाठी विकासाची गंगा अवतरली आहे.



टीमवर्क आणि जनसहभागावर भर


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. प्रत्येक विभागाने, प्रत्येक अधिकाऱ्याने हे काम आपले घरचे समजून करावे. हे एक टीमवर्क आहे आणि सर्वांनी समन्वयाने काम केल्यास हा कुंभमेळा देशभरात आदर्श ठरेल. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ अध्यात्माचा उत्सव नाही, तर विकासाचा महाकुंभ आहे. प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने नाशिकचा हा सोहळा उत्कृष्ट आणि निर्विघ्नपणे पार पडेल, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

Comments
Add Comment

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर केंद्र सरकारचा इशारा: भारतावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून,

भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

पंतप्रधान मोदींची आरोग्य क्षेत्राला शाबासकी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतात क्षयरोग

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला. या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी तपास पथकाने

टेलिग्राम हे दहशतवाद्यांसाठी नवीन चॅट डेस्टिनेशन

नवी दिल्ली : दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार बॉम्बस्फोटात सहभागी असलेले डॉ. उमर मोहम्मद आणि त्यांचे साथीदार

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा