मुंबई लोकलमध्ये फुकट प्रवासाचा नवा फंडा; UTS अॅपचा गैरवापर करून रेल्वेला लावला जातोय गंडा?

मुंबई : मुंबई लोकल म्हणजे सामान्य प्रवाशांसाठी दररोजचा प्रवासाचा अविभाज्य भाग. मात्र काही हुशार प्रवाशांनी या लोकल प्रवासालाच ‘फुकटचा प्रवास’ बनवण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार अधिकृत रेल्वे अॅप ‘UTS’ चा वापर करून केला जात आहे.


2023 पासून सुरू झालेला हा “जुगाड” आता पश्चिम रेल्वेच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे. UTS अॅप हे रेल्वेचे अधिकृत ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरून प्रवासी सुलभतेने लोकल तिकिटे आणि पास खरेदी करू शकतात. पण काही प्रवाशांनी याच सुविधेचा गैरवापर करण्याचा मार्ग शोधला आहे.


हे प्रवासी UTS सीझन पासचे स्क्रीनशॉट घेतात आणि फोटो एडिटिंग अॅप्सच्या मदतीने त्यात तारीख बदलतात, अगदी बनावट QR कोडसुद्धा तयार करतात. बाहेरून पाहता हा पास खरा वाटतो, पण रेल्वेच्या प्रणालीवर स्कॅन केल्यानंतर तो फसवा असल्याचं उघड होतं.



जुलै 2025 मध्ये पहिला प्रकार उघडकीस


पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जुलै 2025 मध्ये पहिल्यांदा असा बनावट UTS पास सापडला होता. त्या नंतर नोव्हेंबरपर्यंत अशा घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली. विशेषतः एसी लोकलमध्ये प्रवासी हा ‘फेक पास जुगाड’ मोठ्या प्रमाणावर वापरत असल्याचे रेल्वे तपासात स्पष्ट झाले आहे.



नायगावमध्ये मंगळवारी उघड झालेला प्रकार


मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विरार एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला नायगाव स्थानकावर तिकीट तपासणीदरम्यान पकडण्यात आले. त्याने अधिकाऱ्यांना UTS अॅपवरील तिकीट दाखवले, जे खरे वाटत होते. पण टीसीला QR कोडमध्ये गडबड आढळली. तपासणी केल्यानंतर ते तिकीट रेल्वेच्या डेटाबेसमध्ये अस्तित्वातच नसल्याचे समोर आले. तपासात समजले की त्या प्रवाशाने जुन्या तिकीटाचा स्क्रीनशॉट घेऊन त्यावर तारीख एडिट केली होती. तत्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करून दंड वसूल करण्यात आला आणि वसई पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली.



रेल्वे प्रशासन अधिक सतर्क


पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांत अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः एसी लोकलमध्ये अशा प्रकारांनी महसूल गमावला जात असल्याने रेल्वे प्रशासनाने तपासणी आणखी कडक करण्याचे आदेश दिले आहेत. टीसींना QR कोड स्कॅनिंगसाठी अद्ययावत उपकरणे देण्यात येणार असून, संशयास्पद तिकिटांवर तात्काळ कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब

Student Threatened For Conversion : धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मुंबई : बोरीवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून

Maharashtra Lok Bhavan : महाराष्ट्राचे ‘राजभवन’ झाले ‘लोकभवन’; अधिसूचना जारी!

मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘लोक कल्याण मार्ग’ आणि ‘पीएम हाऊस’ ऐवजी ‘लोकभवन’ असे

Pratap Sarnaik : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपीडो, उबेर ' सारख्या ॲप आधारित कंपन्या वर गुन्हे दाखल करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

मुंबई : (३ डिसेंबर) शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या '

Orange Gate to Marine Drive Urban Tunnel : मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार, 'ऑरेंज गेट टनेल' जून २०२८ पर्यंत पूर्ण करणार मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

७०० इमारतींच्या खालून भुयार खणणार मुंबई : भुयारी मेट्रोमुळे सोपा झालेला मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार

Goregoan Traffic : वाहतूक कोंडीत अडकून रुग्णाने रुग्णवाहिकेतच जीव सोडायचा का?

गोरेगावमधील भाजपाच्या माजी नगरसेविकेचा प्रशासनाला संतप्त सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव पूर्व येथील आरे