दिल्लीतील महिपालपूरमध्ये स्फोटाचा आवाज, महिला घाबरली आणि पोलिसांना दिली माहिती

दिल्ली : राजधानी दिल्लीतील महिपालपूर परिसरात स्फोटासारखा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी एका महिलेने तात्काळ फायर ब्रिगेडला फोन करून माहिती दिली. काही मिनिटांतच दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. तपासात पोलिसांना कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नाही. नंतर स्पष्ट करण्यात आलं की DTC बसचा टायर फुटल्याने तो आवाज झाला होता. पोलिसांनी सांगितलं की “ही सामान्य घटना आहे आणि घाबरण्यासारखं काही नाही.”


तथापि, अलीकडेच लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटामुळे संपूर्ण दिल्ली हादरली असल्याने या आवाजाने त्या महिलेला भीती वाटली हे स्वाभाविक आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या i20 कार स्फोटात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांमध्ये अजूनही दहशतीचं वातावरण आहे.


महिपालपूर भाग दिल्ली-गुरुग्राम सीमेवर असून, IGI विमानतळाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे अशा कोणत्याही आवाजाने प्रशासन तत्काळ सतर्क होते.


दरम्यान, केंद्र सरकारने लाल किल्ल्याजवळ झालेला कार स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं मान्य केलं आहे. बुधवारी झालेल्या ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’च्या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात देशाच्या सुरक्षेबाबत अर्धा तास चर्चा झाली.


या हल्ल्यामागे दहशतवादी डॉक्टर उमर नबी उर्फ उमर मोहम्मद असल्याचं उघड झालं आहे. उमरच्या मृतदेहाचा डीएनए त्याच्या कुटुंबाशी १०० टक्के जुळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये उमरचा चेहरा मास्कखाली स्पष्ट दिसला होता. त्याने स्फोटाच्या ११ दिवस आधीच ही i20 कार विकत घेतली होती. तो फरिदाबादस्थित व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य होता. तपासात जम्मू-कश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेल्या या नेटवर्कचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांनी सुमारे ३,००० किलो अॅमोनियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फर जप्त केले आहे.

Comments
Add Comment

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या

छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे

रायपूर : भारतमाला प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात झालेल्या अनियमिततांच्या

सुप्रीम कोर्टाची अरावली प्रकरणात स्वतःच्या निर्णयालाच स्थगिती

नवी दिल्ली : अरावली खटल्याची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात पर्वतरांगांच्या नवीन व्याख्येवर