कोलकता: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतासाठी खास आहे कारण भारत सहा वर्षांनी या मैदानावर कसोटी क्रिकेट खेळणार आहे. भारताने नोव्हेंबर २०१९ मध्ये या मैदानात शेवटचा कसोटी सामना बांगलादेश विरुद्ध खेळला होता. आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा एकदा या प्रतिष्ठित मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे.
भारताने या मैदानावर एकूण ४२ कसोटी सामने खेळले आहेत. या ऐतिहासिक मैदानावर भारताचा पहिला कसोटी सामना १९३४ मध्ये खेळला गेला होता. तर शेवटचा सामना २०१९ मध्ये खेळला गेला होता. भारताने या मैदानावर १३ सामने जिंकले असून ९ सामने गमावले आहेत. तर २० सामने अनिर्णित राहिले आहेत. ईडन गार्डनवर भारताचा पहिला विजय १९६१-६२ मध्ये इंग्लंडविरुद्ध १८७ धावांनी झाला होता. तर शेवटचा पराभव २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता.
नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कला उध्वस्त करण्यात जम्मू आणि काश्मीर ...
या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज
ईडन गार्डनवर काळ्या मातीची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांना अनुकूल राहिली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण हे १० सामन्यांत १२१७ धावांसह यादीत अव्वल स्थानावर असून राहुल द्रविड ९६२ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर सचिन तेंडुलकरने या मैदानावर ८७२ धावा केल्या आहेत.
सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
ही खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरली आहे. हरभजन सिंगने ७ सामन्यात ४६ जणांना विकेट घेत बाद करत यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्यानंतर अनिल कुंबळे आणि बिशन सिंग बेदी यांचा क्रमांक लागतो. वेगवान गोलंदाजांमध्ये कपिल देव यांनी सुद्धा या मैदानावर येथे चांगली कामगिरी केली.
भारताचा कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक) (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद कुमार पटेल, अक्षर कुमार रेड्डी, अक्षर कुमार पटेल, ऋषभ रेड्डी. आकाश दीप.
मालिकेतील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल , तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल.