Amravati News : थरकाप उडवणारा व्हिडिओ! लग्नसोहळ्यात स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार; नवरी जागीच बेशुद्ध

अमरावती : लग्न समारंभ म्हटला की, आनंद, जल्लोष आणि आयुष्यभराच्या नव्या सुरुवातीचे वातावरण असते. मात्र, अमरावती (Amravati News) जिल्ह्यातील बडनेरा येथे अशाच एका लग्नसोहळ्याला जीवघेण्या हल्ल्याचे गालबोट लागले आहे. बडनेरा रोडवरील साहिल लॉन येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून, लग्नाच्या स्टेजवरच नवरदेव सुजलराम समुद्रे याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. लग्नाचा स्टेज, वर-वधूचे हास्य आणि पाहुण्यांची गर्दी असतानाच हा थरारक हल्ला झाला. दोन तरुणांनी अचानक स्टेजवर धाव घेऊन नवरदेव सुजलराम समुद्रेवर चाकूने सपासप वार केले. विशेष म्हणजे, या संपूर्ण हल्ल्याचा थरारक व्हिडीओ ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्यामुळे या घटनेची भीषणता समोर आली आहे. आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस एका वाईट आठवणीत रूपांतरित झाला. हा जीवघेणा हल्ला डोळ्यासमोर घडताना पाहून वधूला मोठा धक्का बसला. तिला हा आघात सहन न झाल्यामुळे ती स्टेजवरच बेशुद्ध पडली. या हल्ल्यात नवरदेव सुजलराम समुद्रे गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर साहिल लॉनवर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलीस या दोन हल्लेखोर तरुणांचा शोध घेत आहेत.



नवरदेवावरील हल्ल्याचा थरार ड्रोन कॅमेऱ्यात कैद


https://x.com/NNsonukanojia/status/1988543861329956965?s=20

या व्हिडीओमुळे आरोपींची ओळख पटवणे पोलिसांना सोपे होणार आहे. ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमध्ये आरोपींचे कृत्य स्पष्टपणे दिसत आहे. स्टेजवर नवरदेवावर चाकूने हल्ला केल्यानंतर, ते दोन तरुण तातडीने दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. यावेळी नवरदेवाचे वडील आरोपींच्या मागे धावून त्यांना पकडण्याचा धाडसी प्रयत्न करतात. मात्र, या दरम्यान आरोपींनी त्यांच्यावरही चाकूने हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवर बसून घटनास्थळावरून फरार झाले. ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात अचूकपणे टिपली गेली आहे. या धक्कादायक घटनेमुळे साहिल लॉनवरील लग्नसोहळ्यात एकच खळबळ आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस या ड्रोन कॅमेऱ्यातील व्हिडीओ फुटेजचा आधार घेऊन आणि इतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा कसून शोध घेत आहेत.



नवरदेव सुजलराम समुद्रे गंभीर जखमी


सुजलरामला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेमुळे लग्न समारंभात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच सुजल समुद्रेच्या तिलक नगर परिसरामध्येही तणाव पसरला आहे. हल्ल्याची माहिती मिळताच बडनेरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. पोलीस आता ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडीओ आणि इतर पुराव्यांच्या आधारावर हल्लेखोर आरोपींचा कसून शोध घेत आहेत. या हल्ल्यामागे नेमके काय कारण आहे आणि आरोपींचा सुजल समुद्रेसोबत कोणताही जुना वाद होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह

Pandharpur Temple | मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिरात भाविकांसाठी विशेष नियोजन; १३ व १४ जानेवारीला दर्शन वेळापत्रकात बदल

पंढरपूर : मकरसंक्रांती आणि भोगी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात