डॉ. शाहिनाच्या अटकेमुळे जैश-ए-मोहम्मद कारवाईतील महिला सहभाग उघड

नवी दिल्ली  : फरिदाबाद येथील दहशतवादाचे मोड्युल पोलिसांनी उधळून लावले. त्यात दिल्ली कार स्फोट प्रकरणात तारिक अहमद मलिक, आमिर रशिद, उमर राशिद या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. फरिदाबाद या ठिकाणी जैश-ए-मोहम्मद विंगची हेड डॉ. शाहिनालाही अटक करण्यात आली आहे. डॉ. शाहिना ही जैश-ए- मोहम्मदच्या महिला विंगची म्हणजेच जमात-उल-मोमिनातची प्रमुख होती. फंडिंग, मानसिक स्तरावरचे द्वंद्व, प्रचार या गोष्टींची तिला जबाबदारी देण्यात आली होती.


पाकिस्तानात मसूद अजहरची बहीण सादिया अजहर या सगळ्या गोष्टी बघत होती. सादियाचा पती युसूफ अजहर हा कंदहार हायजॅक प्रकरणाचा मास्टरमाईंड होता. जैश- ए-मोहम्मद या संघटनेने महिलांच्या धार्मिक जबाबदाऱ्या, जिहादच्या नावे जोडण्याची योजना तयार केली आहे. भारतात डॉक्टर शाहिनासारख्या लोकांवर ही जबाबदारी देण्यात आली होती. डॉ. शाहिनाला दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. जैश-ए-मोहम्मदची महिला विंग उभारण्याची जबाबदारी तिच्यावर टाकण्यात आली होती. डॉ. शाहिना लखनऊ येथील लाल बाग परिसरात वास्तव्य करत होती. अल फला विद्यापीठात डॉ. शाहिना शिकवत होती. या विद्यापीठात जिहादसाठी किती विद्यार्थ्यांना तिने तयार केलं होतं का याची माहिती आता घेतली जाते आहे. टेलिग्रामचा तयार केलेल्या ग्रुपमध्ये काही डॉक्टरांचा सहभाग होता.
फरिदाबादमध्ये जैशच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर तिच्या कारमधून एक असॉल्ट रायफल जप्त करण्यात आली होती. यानंतर तिला अटक करण्यात आली. ती काश्मिरी डॉक्टर मुझम्मिल गनी संपर्कात असल्याचे स्पष्ट
झाले आहे.


डॉक्टर मुसैब याला अटक
डॉक्टर मुसैब याला फरिदाबादमधील त्याच्या भाड्याच्या दोन खोल्यांमधून २,९०० किलो स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ जप्त केल्यानंतर अटक झाली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी असलेला मुझम्मिल दिल्लीपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या धौज येथील अल फलाह विद्यापीठात डॉक्टर होता.

Comments
Add Comment

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील

New Zealand Visa : न्यूझीलंडमध्ये आता भारतीयांची चांदी! ५,००० कुशल व्यावसायिकांना थेट वर्क व्हिसा, विद्यार्थ्यांसाठीही मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील व्यापारी संबंधांनी आता एक नवं वळण घेतले आहे. दोन्ही देशांनी मुक्त

इस्रोच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थाने नुकतेच एका ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील