राज्यात पाऊस आणि थंडीचं दुहेरी संकट; हवामान खात्याकडून १२ आणि १३ नोव्हेंबरला अलर्ट

 मुंबई : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने धडक दिल्यानंतर आता वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. देशभरात काही ठिकाणी पाऊस, तर काही भागात कडाक्याची थंडी अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे.


हवामान खात्याच्या माहितीनुसार, चंदीगड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. त्याच वेळी महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस आणि थंड वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.


अरबी समुद्रावर केरळच्या किनाऱ्याजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने दक्षिण भारतातील हवामानही अस्थिर आहे. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याचं भाकीत आहे.


दरम्यान, महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, निफाड, परभणी आणि जेऊर या भागांत थंडीचा कडाका अधिक जाणवतोय. पुण्यातही किमान तापमान 13.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं असून, पुढील काही दिवसांत तापमान आणखी 4 ते 5 अंशांनी घटण्याची शक्यता वर्तवली आहे.


गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी आणि पहाटे गारवा वाढला आहे. हवेत कोरडेपणा जाणवू लागला असून, नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.


महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसासोबत थंडीची लाटही नागरिकांना जाणवणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या आठवड्यात राज्यातील हवामान बदलत राहण्याची शक्यता असून, हिवाळ्याची चाहूल आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब

Student Threatened For Conversion : धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मुंबई : बोरीवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून

Maharashtra Lok Bhavan : महाराष्ट्राचे ‘राजभवन’ झाले ‘लोकभवन’; अधिसूचना जारी!

मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘लोक कल्याण मार्ग’ आणि ‘पीएम हाऊस’ ऐवजी ‘लोकभवन’ असे