चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी

प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक प्रभारी, •महायुतीतील तीन मंत्र्यांची समन्वय समिती, मित्रपक्षांवर टीका-टिप्पणी न करण्याच्या सूचना


मुंबई  : महसूलमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नावाची घोषणा केली.


बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून ५१ टक्के मते घेऊन दोन-तृतीयांश बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू. राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायती यांमध्ये भाजप-महायुती ही प्रचंड बहुमताने विजयी होईल असा मला विश्वास आहे.


मंगळवारी सकाळी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या जिल्हा प्रभारींची बैठक झाली. या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, राज्यातील विविध भागांतील संघटन मंत्री, महामंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. तब्बल तीन तास राज्यातील सर्व निवडणुकांचे विभागनिहाय सादरीकरण बैठकीत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रभाऱ्यांना जास्तीत जास्त महायुतीवर भर देण्याच्या, मित्रपक्षांवर टीका-टिप्पणी न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. यानंतर प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून घोषणा केली.


महायुतीमध्ये स्थानिक पातळ्यांवर मतभेद असल्याने जागावाटपावरून चर्चेदरम्यान वाद, रुसवे-फुगवे, स्वबळ अथवा इतरांसोबत युती असे होण्याची शक्यता आहे.


महायुतीत समन्वयासाठी प्रयत्न : बावनकुळे म्हणाले की, महायुतीत समन्वय टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या समन्वयासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन मंत्र्यांची समिती असेल. यामध्ये एक भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी असे तीन मंत्री समन्वयक म्हणून काम करणार आहेत. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये कुठेही मतभेद आणि मनभेद होणार नाहीत, याची काळजी भाजप घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

नामनिर्देशन पत्रे, निवडणूक खर्च आणि आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांना दिली माहिती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता निवडणूक प्रक्रिया पूर्णतः

सामान्य प्रशासन विभागाकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात ए. शैला, डॉ.

पर्यटकांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेवर नाताळ-नवीन वर्षासाठी विशेष गाड्या

मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या

Manikrao Kokate : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचली!

सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती; आमदारकी कायम राहणार, पण लाभाचे पद धारण करता

वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार

एमएमआरडीए उभारणार नवा पादचारी पूल मुंबई  : वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक आणि लकी हॉटेल जंक्शन परिसरातील तीव्र

मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबईतील रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी