Monday, May 11, 2026

Stock Market Update: सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरणच आयटी शेअर्सने घसरण मर्यादित केली तर इतर शेअर्समध्ये घसरणच

Stock Market Update: सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरणच आयटी शेअर्सने घसरण मर्यादित केली तर इतर शेअर्समध्ये घसरणच

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. मजबूत फंडामेंटल असताना शेअर बाजारातील जागतिक अस्थिरतेचा दबाव आज बसल्याने शेअर बाजारातील सुरूवातीच्या कलात घसरण झाली आहे. प्रामुख्याने गिफ्ट निफ्टी उंचावला असला तरी जागतिक घडामोडीआधारे अनिश्चितता कायम असल्याने गुंतवणूकदारांनी सावधतेचा इशारा बाजारात दिला. सेन्सेक्स २६४.२४ अंकांने व निफ्टी ८१.५५ अंकाने घसरण झाली आहे. सुरूवातीच्या सत्रात मिडकॅप, व स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात इतर सगळ्याच निर्देशांकात घसरण झाली असली तरी आयटी शेअर्समध्ये झालेल्या तेजीमुळे निर्देशांकातील घसरण विशिष्ट पातळीवर मर्यादित राहिली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ एससीआय (६.५२%), एचईजी (५.३७%), डेटा पँटर्न (३.५७%), ज्योती सीएनसी ऑटो (३.१८%), क्राफ्ट्समन (२.४७%), न्यूजेन सॉफ्टवेअर (२.१६%), एम अँड एम (१.६५%) समभागात वाढ झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण टीआरआयएल (१०%), बजाज फायनान्स (६.७६%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (५.७६%), एचबीएल इंजिनिअरिंग (३.९३%), बजाज होल्डिंग्स (२.४३%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (२.३६%), सारेगामा इंडिया (२.३४%), रिलायन्स पॉवर (२.०७%), स्विगी (२.०७%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >