पुणे : भारताची राजधानी दिल्लीमध्ये (New Delhi) सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमुळे (Bomb Blasts) संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या भीषण घटनेत आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार सुरू आहेत. दिल्लीत झालेल्या या स्फोटानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क (Alert Mode) झाल्या आहेत. याचाच भाग म्हणून पुणे शहरातही सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुण्यातील सर्वात संवेदनशील आणि गर्दीचे ठिकाण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आणि आजूबाजूला कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिरासह शहराच्या इतर संवेदनशील भागांमध्येही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन परिसराची देखील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून पाहणी सुरू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, प्रमुख सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort Blast) झालेल्या कार स्फोटानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक ...
शिर्डी पोलिसांकडून प्रवेशद्वारावर वाहनांची कसून तपासणी
बॉम्बस्फोटांच्या (Bomb Blasts) भयानक घटनेनंतर देशभरातील प्रमुख धार्मिक आणि सार्वजनिक स्थळांच्या सुरक्षेबाबत अत्यंत कडक खबरदारी घेतली जात आहे. याचाच भाग म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या साईबाबांच्या शिर्डीतही सुरक्षा यंत्रणा 'अलर्ट मोड'वर आल्या आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी पोलिसांकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शिर्डीच्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिर्डीत दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता, सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्तीबद्दल पोलिसांना तातडीने माहिती द्यावी, अशा सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत. शिर्डीच्या या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी पोलीस प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे.






