बिहारमध्ये १२२ जागांसाठी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आज पार पडणार आहे. बिहारच्या अंतिम टप्प्यातील मतदानात एकूण १२२ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या टप्प्यातील निवडणूकीमध्ये एकूण १,३०२ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद होणार आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेच्या देखरेखीखाली मतदानाला सुरुवात झाली आहे.


बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६५.८ टक्के मतदान झाले, ज्यामुळे मागील सर्व आकडेवारी मोडीस निघाली. यामुळे दुसऱ्या टप्प्यातही भरपूर मतदान होण्याची अपेक्षा आहे. आज होणाऱ्या मतदानात नेपाळ सीमेलगच्या जिल्ह्यांमध्ये श्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अरारिया आणि किशनगंज यांचा समावेश आहे. ज्यात सीमांचलचा भाग महत्त्वाचा मानला जात आहे. कारण यातील बहुसंख्य जिल्हे मुस्लीमबहुल असल्याने येथे घुसखोरीचा मुद्दा धरून ठेवण्यात आला होता.




दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी ४५,३९९ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. ज्यात ४०,०७३ मतदारसंघ ग्रामीण भागातील आहे. तर मतदारांमध्ये ३० ते ६० वर्षे वयोगटात २.२८ कोटी मतदार असून १८ ते १९ वर्षे वयोगटात ७.६९ लाख मतदार आहेत. यातील अनेकजण पहिल्यांदा मतदान करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे १२२ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या या निवडणूकीत एकूण १.७५ कोटी महिला मतदार आहेत.

Comments
Add Comment

Laxmi Mittal Ukraine Steel Plant : लक्ष्मी मित्तल यांच्या स्टील प्लांटवर रशियाचा मिसाईल हल्ला; २ जणांचा मृत्यू, १४ कर्मचारी जखमी

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्ध अधिकच तीव्र होत असून, रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एकावर

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी प्रकरणातील न्यायमूर्ती पुन्हा चर्चेत; आतापर्यंत 35 दोषींना सुनावली फाशीची शिक्षा

उत्तर प्रदेश : ज्ञानवापी मशीद प्रकरणात सर्वेक्षणाचे आदेश देणारे उत्तर प्रदेशातील न्यायमूर्ती रवी कुमार दिवाकर

Fire at a hotel in Birbhum : तारापीठ मंदिर परिसरात भयंकर आग! साखरझोपेत ७ भाविकांचा जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू!

पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ येथे एका हॉटेलला पहाटेच्या

Tarapith Hotel Fire : तारापीठ येथील हॉटेलला पहाटे भीषण आग; 6 पर्यटकांचा मृत्यू, अनेक जखमी

पश्चिम बंगाल :  पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील प्रसिद्ध तारापीठ येथे सोमवारी सकाळी एका खासगी हॉटेलला भीषण

Ashokdham Temple : बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भाविकांचा मृत्यू, 12 हून अधिक जखमी

बिहार : बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली.

UGC NET 2026 : UGC-NET जून 2026 ची 3 विषयांची परीक्षा पुन्हा होणार; NTA ने जाहीर केलं वेळापत्रक

मुंबई :  UGC-NET जून 2026 सत्रातील परीक्षार्थींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA)