मुलांना रोजच्या पराठ्यात नवा बदल हवा असतो आणि पनीरसारखी हेल्दी गोष्ट दिली, तर त्यांच्या वाढीला सर्वात चांगला फायदा होतो. पण पनीर दिसलं की अनेक मुलं तोंड वाकडं करतात. म्हणूनच पनीरला दिला आहे एक मजेशीर ट्विस्ट-पकोडा बनवून तो पराठ्यात लपवला! बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, चीजी-पनीरी चव, टिफिनमध्ये थंड झाला तरी तितकाच टेस्टी! प्रोटीन, कॅल्शियमने भरलेला हा पराठा मुलांची उंची, हाडांची ताकद आणि दैनंदिन ऊर्जा यासाठी खास उपयुक्त. खेळात, अभ्यासात किंवा इतर उपक्रमात दम न लागता मुलांनी धावावे, हसावे, खेळावे यासाठी...
(टिफिनसाठी परफेक्ट - बाहेर कुरकुरीत, आतून चीजी-पनीर!)
साहित्य :
सारणासाठी : पनीर १ कप (क्युब्स/लहान चौकोनी तुकडे) मीठ चवीनुसार, लाल तिखट मिरची पावडर – अर्धा टीस्पून, हळद – चिमूटभर आमचूर/लिंबाचा रस – अर्धा टीस्पून शिमला मिरची /कॉर्न चाट मसाला – पाव टीस्पून बेसन – पाऊण कप तांदळाचे पीठ – १ टेबलस्पून, मीठ – चवीनुसार, थोडीशी हळद, पाणी पराठ्यासाठी : गव्हाचे पीठ – २ कप तूप/बटर – शेकायला थोडे दूध – पीठ मऊ होण्यासाठी
कृती : गव्हाचे पीठ + दूध + पाणी + मीठ घालून मऊ आणि लवचिक कणिक करा. पनीर + मसाले + शिमला मिरची/कॉर्न एकत्र हलके मिक्स करा. पनीरचे मसाले लावलेले तुकडे बेसन बॅटरमध्ये बुडवा. तव्यावर हलके तूप/तेल घालून शॅलो फ्राय करा.
डीप फ्रायची गरज नाही – पराठा बनवण्यासाठी पीठाची पोळी लाटून त्यात पनीर पकोडे ठेवा. चारही बाजूंनी फोल्ड करून चौरस पाकीट बनवा. हलक्या हाताने लाटून घ्या. तव्यावर तूप/बटर घालून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या. सर्व्हिंग : केचप + दही मिंट डिप मुलांच्या टिफिनमध्ये छोटी बाईट साइज पट्ट्या कापून द्या.
टिप्स : मुलांना खायला सोपे जावे म्हणून मिनी-पराठे करा. चीज घातल्यास आणखी टेस्टी होईल. हवे असल्यास बॅटरमध्ये थोडे तिळ घालू शकता – चव व प्रोटीन दोन्ही वाढतं.






