मोदींचा भूतान दौरा, द्विपक्षीय संबंधांना मिळणार नवी चालना

भूतान : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच भारत-भूतानच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पुनतसांगचु-II या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटनही पंतप्रधान करतील.


भूतान दौऱ्यात मोदी आणि राजा वांगचुक १०२० मेगावॅट क्षमतेच्या पुनतसांगचु-II जलविद्युत प्रकल्पाचे संयुक्तपणे उद्घाटन करतील. या प्रकल्पामुळे भारत आणि भूतानमधील ऊर्जा सहकार्य आणखी मजबूत होईल. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “ही भेट दोन्ही देशांमधील मैत्री, विश्वास आणि सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाची आहे.”


भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे प्रदर्शन


या भेटीत धार्मिक आणि सांस्कृतिक आदानप्रदानालाही विशेष स्थान दिले गेले आहे. भारताकडून पाठवण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या पिप्रहवा अवशेषांचे प्रदर्शन थिंपू येथे आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी ताशिचोदझोंग येथे या अवशेषांसमोर प्रार्थना करतील आणि भूतान सरकारने आयोजित जागतिक शांती प्रार्थना महोत्सवात सहभागी होतील. मंत्रालयाच्या मते, “भारत आणि भूतानमधील आध्यात्मिक वारसा आणि लोकांतील नाते ही दोन्ही देशांच्या विशेष मैत्रीची खरी ओळख आहे.”


प्रादेशिक आणि आर्थिक विषयांवर चर्चेची संधी


पंतप्रधान मोदी आणि भूतानचे नेते प्रादेशिक सहकार्य, आर्थिक भागीदारी आणि सीमापार विकास प्रकल्पांवर चर्चा करतील. विशेष म्हणजे, सप्टेंबरमध्ये भारताने भूतानसोबत ४,००० कोटी रुपयांचा सीमापार रेल्वे प्रकल्प जाहीर केला होता. या अंतर्गत, भूतानमधील गेलेफू आणि सामत्से शहरांना आसाममधील कोक्राझार व पश्चिम बंगालमधील बनारहाटशी जोडणाऱ्या रेल्वे लिंक तयार केल्या जात आहेत. हा भूतानसाठी पहिलाच रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्प ठरणार आहे.

Comments
Add Comment

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने