कुटुंबियांना वाचवण्यासाठी १३ वर्षीय मुलाची समुद्राशी झुंज; उसळत्या लाटा आणि त्यात....

पर्थ : अवघ्या तेरा वर्षांच्या मुलाने समुद्र आणि सोसाट्याच्या वाऱ्याशी झुंजत सलग चार तास पोहून आई, भाऊ आणि बहीण या तिघांना वाचवले. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे.


ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये राहणारी ४७ वर्षांची जोआन एपलबी तिच्या तीन मुलांसोबत समुद्रावर गेली होती. तिच्यासोबत १३ वर्षांचा ऑस्टिन एपलबी, १२ वर्षांचा ब्लू एपलबी आणि आठ वर्षांची ग्रेस एपलबी ही मुलं होती. सर्व जण समुद्रात उतरले. पॅडल बोर्डिंग आणि कयाकिंग असे साहसी खेळ खेळण्याच्या उद्देशानेच ते आले होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना वाऱ्यानं दिशा बदलली. समुद्राच्या लाटांनी एपलबी कुटुंबाला एकदम आत ओढून घेतलं.


अवघ्या १३ वर्षाचा मुलगा जो आपल्या नजरेसमोर आपल्या कुटुंबाला बुडताना पाहतोय आणि त्यांना वाचवण्यासाठी गेले ४ तास प्रयत्न करतोय. त्यात त्याचा प्रतिकार करणारा जोरदार वारा एवढेच नाहीतर समुद्राच्या उंचच्या- उंच लाटांशी त्यानी झुंज दिली. मधेच इतर संकटही अली परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्याचे प्रयत्न शेवट पर्यंत सुरु ठेवले. आणि आपल्या कुटुंबियांना वाचवले. जोआन एपलबी ब्लू एपलबी आणि ग्रेस एपलबी हे तिघे संकटात सापडले. ऑस्टिन एपलबीने कसेबसे स्वतःला वाचवले. नंतर बचाव पथकाच्या मदतीने त्याने घरातल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.


हसत खेळत समुद्राच्या लाटांचा आणि वाऱ्याचा आनंद लुटत असलेले कुटुंब अवघ्या काही सेकंदात संकटात सापडले होते. पण १३ वर्षांच्या ऑस्टिन एपलबीने हिंमत दाखवली. स्वतः सुरक्षित झाल्यावर त्याने कयाकमध्ये बसून कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न केला. कयाकमध्ये पाणी भरू लागताच त्याने लाईफ जॅकेट घातले आणि समुद्रात उडी मारली. यानंतर समुद्र आणि सोसाट्याच्या वाऱ्याशी झुंजत सलग चार तास पोहून समुद्राबाहेर आला.


सुरुवातीचे दोन तास तो लाईफ जॅकेट घालूनच तो पोहत होता. पण नंतर हे जॅकेट पोहोण्याचा वेग कमी करत असल्याची जाणीव झाल्यावर त्याने धाडसी आणि धोकादायक असा निर्णय घेतला. भर समुद्रात अंगावरचे लाईफ जॅकेट काढून ऑस्टिनने पुन्हा पोहण्यास सुरुवात केली. मदत घेतल्याशिवाय घरच्यांना वाचवता येणार नाही हे लक्षात येताच त्याने कसेबसे समुद्राबाहेर येऊन बचाव पथकाशी संपर्क साधला. बचाव पथकाच्या सहकार्याने अखेर ऑस्टिनने घरच्यांना वाचवले. रेस्क्यू टीमच्या हेलिकॉप्टरने जोआन, ब्लू आणि ग्रेस या तिघांना पॅडलबोर्डला धरून लाटांवर तरंगत असल्याचे बघितले, तिघांच्या अंगावर लाईफजॅकेट होते त्यामुळे ते समुद्रात खेचले गेले तरी पाण्यावर तरंगत सुरक्षित राहिले होते. अखेर हेलिकॉप्टरमधील टीमने मदत दिली आणि तिघांना सुरक्षितरित्या वाचवले, समुद्राबाहेर आणले. यानंतर पूर्ण एपलबी कुटुंबाला वैद्यकीय उपचारांसाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले. आवश्यक ते उपचार केल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली. यानंतर पूर्ण कुटुंबाने मरिन रेस्क्यू टीमची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले.

Comments
Add Comment

Iran Missile Attack on UAE Oil Tanker : होर्मुझमध्ये तणावाचा स्फोट! UAEच्या दोन तेलवाहू जहाजांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय खलाशी ठार, ८ जण जखमी

होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दोन तेलवाहू

Donald Trump : "आम्हीच होर्मुझचे रक्षक असल्याने आता आम्ही २०% सुरक्षा शुल्क आकारणार"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी घोषणा करत जागतिक

Accident : व्हिएतनाम बोट दुर्घटना; १५ भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज रात्री मुंबईत दाखल होणार

मुंबई: व्हिएतनाममधील फूक्वॉक बेटाजवळ झालेल्या भीषण स्पीडबोट अपघातात जीव गमावलेल्या १५ भारतीय पर्यटकांचे

Massive Fire in Bangkok Bar : भर पार्टीत बारला भीषण आग; २७ जणांचा होरपळून मृत्यू, तर ६० हून अधिक जखमी

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉक रविवारी रात्री एका भयंकर दुर्घटनेने हादरून गेली. वीकेंडच्या पार्टीसाठी एका

America Iran War : अमेरिकेचे इराणवर १४० लक्ष्यांवर भीषण हवाई हल्ले; इराणचाही घातक पलटवार, मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने पुन्हा एकदा धोकादायक वळण घेतले असून, मध्यपूर्वेतील तणाव कमालीचा वाढला

Bangkok Bar Fire : बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; बारला आग लागून २७ जणांचा मृत्यू

बँकॉक  : थायलंडची राजधानी बँकॉक (Bangkok) येथे रविवारी (१२ जुलै) मध्यरात्री एका बारमध्ये (Bar) भीषण आग (Fire) लागून २७ जणांचा