लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहाच्या मुलाची हत्या

झिंतान : लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा मुलगा सैफ अल-इस्लाम गद्दाफीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजधानी त्रिपोलीपासून १३६ किलोमीटर नैर्ऋत्येला असलेल्या झिंतान शहरात ही घटना घडली. ही हत्या कोणी केली हे अद्याप समजलेले नाही.


काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान आणि लिबियातील सध्याचे सरकार यांच्यात एक करार झाला होता. या कराराला आक्षेप घेणाऱ्या सैफ अल-इस्लाम गद्दाफीची हत्या झाल्यामुळे यामागे पाकिस्तानचा किंवा पाकिस्तानला मदत करणाऱ्यांपैकी एखाद्या व्यक्ती अथवा संस्थेचा हात असल्याची चर्चा आहे. पण लिबिया सरकारने या प्रकरणी तपास सुरू आहे असे मोघम उत्तर दिले आहे. सैफ अल-इस्लाम गद्दाफीच्या हत्येमुळे लिबियात पुन्हा हिंसेचे थैमान सुरू होण्याची भीती काही जण व्यक्त करत आहेत.



कोण होता अल-इस्लाम गद्दाफी ?


त्रिपोलीत २५ जून १९७२ रोजी जन्मलेला सैफ अल-इस्लाम गद्दाफी हा लिबियावर ४२ वर्षे राज्य करणाऱ्या हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीचा मुलगा. सफिया फरकाश ही त्याची आई. सफियाचा हा दुसरा मुलगा. वडिलांच्या काळात लहान वयातच सैफ अल-इस्लाम गद्दाफी याचे देशातले महत्त्व वाढले होते. मुअम्मर गद्दाफीचा वारसदार म्हणून त्याच्याकडे अनेकजण बघत होते. पुढे लिबिया आणि पाश्चात्य देश यांच्यातील अधिकृत दुवा म्हणून सैफ अल-इस्लाम गद्दाफी काम करत होता. अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंधांमधून देशाला बाहेर काढण्यासाठी सैफ अल-इस्लाम गद्दाफीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि युरोपमधील शिक्षणामुळे यामुळे त्याला अनेकजण लिबियाचा आधुनिका चेहरा म्हणू लागले होते. त्याने १९९४ मध्ये त्रिपोलीच्या अल-फातेह विद्यापीठातून अभियांत्रिकी विज्ञानातील पदवी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील इमाडेक बिझनेस स्कूलमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याला २००८ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने पीएच.डी. प्रदान केली होती. विशेष म्हणजे २००५ मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने त्याची ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून निवड केली होती. तसेच डब्ल्यूईएफचे संस्थापक क्लॉस श्वाब यांनी जानेवारी २०११ मधील दावोस परिषदेसाठी त्याला वैयक्तिकरीत्या आमंत्रित केले होते.



सैफ अल-इस्लाम गद्दाफीचा विक्षिप्त स्वभाव


सैफ अल-इस्लाम गद्दाफीचा विक्षिप्त स्वभाव हा अनेकदा चर्चेचा विषय ठरला होता. व्हिएन्नामध्ये असताना त्याला पाळीव वाघ तिथल्या प्राणिसंग्रहालयात ठेवण्याची विशेष परवानगी मिळाली होती. त्रिपोलीजवळील त्याच्या फार्म हाऊसवर एक पांढरा वाघ होता.



मुअम्मर गद्दाफीची २०११ मध्ये हत्या


सैफ अल-इस्लाम गद्दाफीचे वडील मुअम्मर गद्दाफीची २०११ मध्ये लिबियातच हत्या झाली. यानंतर बंडखोरांमुळे अल-इस्लाम गद्दाफीला अटक झाली. तो प्रदीर्घ काळ तुरुंगात होता. या काळात त्याचा जगाशी संपर्क तुटला होता. पण जून २०१७ मध्ये त्याची सार्वजनिक माफी देऊन तुरुंगातून सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर काही काळ तो जगापासून दूर होता. यानंतर लिबियातील ‘मशाशिया’ टोळी आणि झिंतन ब्रिगेडच्या सैनिकांच्या संरक्षणात राहून त्याने हळू हळू सार्वजनिक जीवनात सक्रीय होण्याचे प्रयत्न सुरू केले. अलीकडेच त्याने पाकिस्तान आणि लिबिया यांच्यात झालेल्या कराराच्या विरोधात जाहीर मतप्रदर्शन केले होते. यानंतर काही दिवसांतच त्याची हत्या झाली. चार मुखवटाधारी हल्लेखोरांनी घरात घुसून त्याची हत्या केली. हल्लेखोरांनी हत्या करण्याआधीच सैफ अल-इस्लाम गद्दाफीच्या घरातील सीसीटीव्ही यंत्रणा निकामी केली होती.

Comments
Add Comment

Accident : व्हिएतनाम बोट दुर्घटना; १५ भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज रात्री मुंबईत दाखल होणार

मुंबई: व्हिएतनाममधील फूक्वॉक बेटाजवळ झालेल्या भीषण स्पीडबोट अपघातात जीव गमावलेल्या १५ भारतीय पर्यटकांचे

Massive Fire in Bangkok Bar : भर पार्टीत बारला भीषण आग; २७ जणांचा होरपळून मृत्यू, तर ६० हून अधिक जखमी

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉक रविवारी रात्री एका भयंकर दुर्घटनेने हादरून गेली. वीकेंडच्या पार्टीसाठी एका

America Iran War : अमेरिकेचे इराणवर १४० लक्ष्यांवर भीषण हवाई हल्ले; इराणचाही घातक पलटवार, मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने पुन्हा एकदा धोकादायक वळण घेतले असून, मध्यपूर्वेतील तणाव कमालीचा वाढला

Bangkok Bar Fire : बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; बारला आग लागून २७ जणांचा मृत्यू

बँकॉक  : थायलंडची राजधानी बँकॉक (Bangkok) येथे रविवारी (१२ जुलै) मध्यरात्री एका बारमध्ये (Bar) भीषण आग (Fire) लागून २७ जणांचा

India-New Zealand Free Trade Agreement : भारत-न्यूझीलंड संबंधांना नवी दिशा; व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य, ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ करारावर शिक्कामोर्तब

ऑकलंड : भारत आणि न्यूझीलंडने द्विपक्षीय संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दोन्ही

Iran vs America War : होर्मुझ सामुद्रधुनी बंद होताच अमेरिकेचा इराणवर तिसरा हल्ला

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) पुन्हा एकदा होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद