आठव्या मजल्यावरून पडून मजुराचा जागीच मृत्यू

मालाड : मालाड पूर्व येथील शांती नगर भागात सुरू असलेल्या एका नवीन इमारतीच्या बांधकाम साईटवर आठव्या मजल्यावरून खाली पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ईशराफूल नावाचा हा मजूर सोमवारी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास काम करत असताना ही घटना घडली.


बांधकाम सुरू असलेल्या साईटच्या आठव्या मजल्यावरून खाली पडून मजूर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णवाहिकेने जोगेश्वरी येथील ट्रामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच याच परिसरात १९०० किलो वजनाची एक क्रेन कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नव्हती, परंतु क्रेन १८ टायरच्या एका ट्रकवर पडल्यामुळे ट्रकाचे दोन तुकडे झाले होते

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू

Tree Adoption Scheme : मुंबईत राबवली जाणार वृक्ष दत्तक योजना; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि