मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी काढण्यात येत असून या पहिल्या टप्प्यात अनुसूचित आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग करता उतरत्या क्रमाने लोकसंख्येनुसार सोडत काढण्यात आली.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार निवडणूक विभागाने आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली. यातील २२७ प्रभागांच्या चिठ्ठ्या दाखवण्यात आल्या. त्यातून अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती याकरता सोडत काढण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त शहर अश्विनी जोशी, सहआयुक्त विश्वास शंकरवार, निवडणूक विभागाचे ओ एस डी विजय बालमवार, उपायुक्त विश्वास मोटे, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, पल्लेवाड,आदी उपस्थित होते.