ढोकाळीतील ५० वर्षे जुने मंदिर गायब!

तक्रार नोंदविण्यास पोलीसांची टाळाटाळ


ठाणे  : ढोकाळी येथील हायलँड पार्क रोड येथे असलेले ५० वर्षे जुने कुलदैवताचे मंदिर मूर्तींसह गायब झाल्याची तक्रार पोलीस नोंदवून घेत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी आज आमदार संजय केळकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केल्याची माहिती आ. केळकर यांनी दिली. भाजपचे खोपट येथील कार्यालयात आयोजित 'जनसेवकाचा जनसंवाद' या कार्यक्रमात ढोकाळी येथील ग्रामस्थांनी आ.केळकर यांची भेट घेतली. मागण्यांचे निवेदन त्यांना सुपूर्द करण्यात आले आहे.


नवरात्रीनिमित्त २० सप्टेंबर रोजी मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना देवांच्या मूर्ती, चांदीचे सामान आणि मंदिरही गायब झाल्याचे आढळून आले. तर जवळील विहिरही बुजवण्यात आल्याचे दिसून आले.
पोलिसांना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी आ. केळकर यांच्याकडे केली आहे.


सोमवारी या कार्यक्रमात आ. केळकर यांच्याकडे अनेक प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात विकासकाने घरांसाठी केलेली फसवणूक, शैक्षणिक विभाग, ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक, नोकरी अशी अनेक विषयांबाबत निवेदने प्राप्त झाली आहेत. यावेळी जनसंवाद कार्यक्रमास माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, युवा मोर्चाचे सुरज दळवी, जितेंद्र मढवी, मेघनाथ घरत, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Thane : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

ठाणे : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Thane News : कासारवडवलीतील ७८० मीटर डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार; अण्णा बनसोडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : ठाण्यातील कासारवडवली-मोगरपाडा परिसरातील ७८० मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी चर्चा

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक

Eknath Shinde : गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवा! मनपांना उपमुख्यमंत्र्यांचे आदेश; उत्कृष्ट काम करणाऱ्या पालिकेला बक्षीस

खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांना कामाला लागण्याचे निर्देश पावसाळ्यात तातडीने

Mira Road : स्कूल व्हॅन रस्त्यावरून जात असताना मेट्रोचा स्लॅब कोसळला, आणि...

मिरा रोड : मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मेट्रोशी संबंधित कामं प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच्या कामांमुळे काही

Dombivli Local Train Accident : डोंबिवली लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू; पोस्टमार्टेम रिपोर्टने तपासाला नवे वळण

डोंबिवली : डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर