ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रवक्ते मंडळात मोठा फेरबदल करण्यात आला असून, पक्षातील दोन प्रमुख नेत्यांना, रुपाली ठोंबरे-पाटील आणि अमोल मिटकरी यांना प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे. पक्षातील वाढता अंतर्गत वाद आणि वादग्रस्त वक्तव्ये या निर्णयामागे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी वादात अडकलेल्या युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना मात्र या फेरबदलात 'अभय' मिळाल्याची चर्चा आहे.



ठोंबरे-पाटील यांच्या हकालपट्टीचे कारण काय?


रुपाली ठोंबरे-पाटील यांची हकालपट्टी होण्यामागे त्यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी असलेला जाहीर वाद कारणीभूत ठरला. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठोंबरे-पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. हा वाद इतका वाढला की, पक्षाकडून ठोंबरे-पाटील यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. रुपाली ठोंबरे-पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर काही तासांतच त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याने, पक्षाने शिस्तभंग सहन केला नसल्याचे स्पष्ट होते.



मिटकरींच्या वादग्रस्त वक्तव्यांचा फटका


दुसरीकडे, पक्षाचे नेते अमोल मिटकरी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये (शिंदे-फडणवीस-पवार गट) वारंवार तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षाला आणि महायुतीला संभाव्य अडचणीतून वाचवण्यासाठी, पक्षाने त्यांचीही प्रवक्ते पदावरून उचलबांगडी केली आहे.



सूरज चव्हाण यांना 'क्लीन चिट'


या पार्श्वभूमीवर, सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे सूरज चव्हाण यांना मिळालेले अभय. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण केल्याप्रकरणी चव्हाण यांच्यावर मोठी टीका झाली होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवार यांनी त्यांना युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त होण्याचे आदेश दिले होते.


मात्र, नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्तीमध्ये त्यांना कोणताही फटका बसलेला नाही. त्यामुळे, एका बाजूला शिस्तीचा बडगा उगारताना, दुसऱ्या बाजूला पक्षाने एका नेत्याला महत्त्वाच्या घटनेनंतरही सक्रिय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पक्षाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.



प्रवक्ते म्हणून कोणाला संधी मिळाली?


अनिल पाटील
रुपाली चाकणकर
ब्रिजमोहन श्रीवास्तव
चेतन तुपे
आनंद परांजपे
अविनाश आदिक
सना मलिक
राजलक्ष्मी भोसले
सुरज चव्हाण
हेमलता पाटील
प्रतिभा शिंदे
विकास पासलकर
राजीव साबळे
प्रशांत पवार
श्याम सनेर
सायली दळवी
शशिकांत तरंगे

Comments
Add Comment

पुण्यातून २०६ किमी लांबीचा सहापदरी महामार्गाचा प्रस्ताव

पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा

इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून

Sangli Bailgada Race : धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली! 'हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल' जोडीने सांगलीत मारले मैदान; पुढच्यावर्षी विजेत्याला थेट BMW कार मिळणार

सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल

तेजस लढाऊ विमानांसाठी मोठा करार!

भारत अमेरिकेकडून ११३ जीई इंजिन खरेदी करणार,  स्वदेशी जेट उत्पादनाला मिळणार चालना हैदराबाद : हिंदुस्तान

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा

पंढरपुरातील पांडुरंगाच्या नवीन लाकडी रथाचे प्रस्थान

कोकणातील कारागिरांनी पूर्ण केले पवित्र कार्य पंढरपूर : पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे