राज्यात गारठा वाढला !

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा सर्वाधिक प्रभाव, जळगावमध्ये तापमान ,१० अंश सेल्सियसवर


मुंबई  : राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून थंडीचे जोरदार आगमन झाले. पारा घसरू लागल्याने हुडहुडी वाढली आहे. सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात सौम्य तर कोकणात थंडी कमी आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान उत्तर भारतात गारठा वाढल्याने राज्यातही त्याचा परिणाम होत आहे, दरम्यान जळगावमध्ये महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तर भारतात सध्या बर्फवृष्टी होत आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही देखील विशेषकरून उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये पारा केवळ १० अंश सेल्सियसपर्यंत घसरला. नाशिकमध्ये किमान तापमान १२ अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे. मुंबई तसेच कोकणात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज तसेच राज्यातील इतर भागांपेक्षा थंडी कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि परिसरात किमान तापमान १६ अंश सेल्सियस पेक्षा कमी झाले आहे. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १३.२ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. तर कोल्हापूरमध्ये १९ अंश सेल्सियस इतके नोंदविले. मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर आणि परभणीमध्ये किमान तापमान १३ अंश सेल्सियस दरम्यान आहे. याशिवाय नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली व बीडमध्येही थंडी वाढली आहे, तर विदर्भातील अमरावतीत पारा चांगलाच घसरला असून तापमान १३ अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले गेले आहे. कोकणपट्ट्यात हवामान उबदार पण धुकेदार राहील. पुणे आणि नाशिक विभागात सकाळ-संध्याकाळ गारठा वाढणार आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईमध्ये मात्र १४ नोव्हेंबरपर्यंत कमाल तापमानात फारसा दिलासा मिळेल अशी शक्यता नाही.

Comments
Add Comment

Sangli Bailgada Race : धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली! 'हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल' जोडीने सांगलीत मारले मैदान; पुढच्यावर्षी विजेत्याला थेट BMW कार मिळणार

सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल

तेजस लढाऊ विमानांसाठी मोठा करार!

भारत अमेरिकेकडून ११३ जीई इंजिन खरेदी करणार,  स्वदेशी जेट उत्पादनाला मिळणार चालना हैदराबाद : हिंदुस्तान

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा

पंढरपुरातील पांडुरंगाच्या नवीन लाकडी रथाचे प्रस्थान

कोकणातील कारागिरांनी पूर्ण केले पवित्र कार्य पंढरपूर : पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी टीईटी परीक्षेकरिता आधुनिक तंत्राचा वापर

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) बोगस उमेदवारांसह इतर कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य परीक्षा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी ब्रिटिश सरकारकडे करणे अपेक्षित होते का ?

सरसंघचालक मोहन भागवत यांचा काँग्रेसला सवाल मुंबई : "आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली; मग आम्ही ब्रिटिश सरकारकडे