Sangli Bailgada Race : धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली! 'हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल' जोडीने सांगलीत मारले मैदान; पुढच्यावर्षी विजेत्याला थेट BMW कार मिळणार

सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल अखेर रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला आणि या शर्यतीचा थरार अनुभवणाऱ्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. या स्पर्धेला अलिशान गाड्या आणि आकर्षक बक्षीसे ठेवल्यामुळे ती राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. अंतिम फेरीत अनेक दिग्गज बैलजोड्यांना मागे टाकत 'हेलिकॉप्टर बैज्या' आणि 'ब्रेक फेल' या बैलजोडीने मैदान मारले आणि मानाची 'फॉर्च्युनर' गाडी (Fortuner Car) जिंकण्याचा मान पटकावला. या विजयी जोडीतील 'हेलिकॉप्टर बैज्या' हा कोल्हापूरच्या शिरोळ येथील बाळू दादा हजारे यांचा आहे, तर 'ब्रेक फेल' हा सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा आहे. या बैलजोडीने विजेतेपद पटकावताच उपस्थितांनी मोठा जल्लोष केला आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या स्पर्धेसाठी केवळ सांगलीतूनच नाही, तर राज्यभरातून बैलगाडी मालक आणि शर्यतीचा शौक असणारे दर्दी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अशा मोठ्या स्पर्धेमुळे शौकिनांना पुन्हा एकदा पारंपरिक थरार अनुभवता आला.



पुढील बैलगाडी शर्यतीचे बक्षीस 'BMW'!


सुमारे ५०० एकरच्या भव्य मैदानावर आयोजित केलेल्या या थरारक शर्यतींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या बैलगाड्यांसाठी ठेवलेली अलिशान बक्षीसे ही शर्यतीचे प्रमुख आकर्षण ठरली. अंतिम फेरीत दोन बैलजोड्यांनी बाजी मारत दोन फॉर्च्युनर गाड्या ही गाडी 'हेलिकॉप्टर' आणि 'ब्रेकफेल' या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत जिंकली. तर, दुसरी फॉर्च्युनर गाडी 'लखन' आणि 'सर्जा' या बैलजोडीने आपल्या नावावर केली. श्रीनाथ केसरी शर्यतीचे मैदान संपताच आयोजक चंद्रहार पाटील यांनी एक धक्कादायक आणि मोठी घोषणा केली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये मोठा उत्साह संचारला. त्यांनी जाहीर केले की, त्यांच्या पुढील बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम बक्षीस थेट 'BMW' कार असेल. या घोषणेमुळे राज्यातील बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात आणखी एका विक्रमी बक्षीसाची नोंद झाली असून, पुढील स्पर्धेची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे.



'कोडण्याचा मळा' ठरला सर्वात मोठा मैदान


बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील सर्वात मोठे मैदान म्हणून गाजलेल्या सांगलीतील तासगाव-बोरगावजवळील कोडण्याचा मळा येथे आयोजित श्रीनाथ केसरी स्पर्धेचा थरार नुकताच पार पडला. या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद आणि बक्षिसांची यादी अभूतपूर्व होती. स्पर्धेत फॉर्च्युनर (Fortuner), थार (Thar), ट्रॅक्टर, बुलेट आणि तब्बल १५० दुचाकी यांसारख्या अलिशान बक्षिसांसाठी राज्यभरातील हजारो बैलगाड्या धावल्या. लाखो बैलगाड्या शौकिनांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या अत्यंत थरारक शर्यतीमध्ये 'हेलिकॉप्टर बैज्या' आणि 'ब्रेकफेल' या शक्तिशाली बैलजोडीने मैदान मारले. या जोडीने श्रीनाथ केसरीचा सर्वोच्च बहुमान पटकावला आहे. स्पर्धेचे आयोजक पैलवान चंद्रहार पाटील यांनी यावेळी दोन मोठ्या घोषणा केल्या. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा थेट मुंबईतील मंत्रालयाच्या समोर आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेची भव्यता कायम ठेवत, चंद्रहार पाटील यांनी त्यांच्या पुढील बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम बक्षीस थेट 'BMW' गाडी असेल, असे जाहीर केले आहे. या विक्रमी आयोजनामुळे बैलगाडी शर्यतीचा पारंपरिक खेळ पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्य धारेत आला आहे.



मी एवढी गर्दी कधी पाहिली नाही, बैल म्हणजे सेलिब्रिटी आहेत : एकनाथ शिंदे


या बैलगाडा शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. महिला बैलगाडा शर्यत हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हटले की, ‘आज येथे धुरळा उडाला आहे. रेकॉर्ड ब्रेक बैलगाडी शर्यत या ठिकाणी भरवली आहे. एखाद्या फिल्मस्टारला जेवढी गर्दी होत नाही. तेवढी गर्दी माझ्या या लाडक्या बैलांना पाहण्यासाठी येथे झाली आहे. मी एवढी गर्दी कधी पाहिली नाही. ज्या बैलांनी भाग घेतला आहे. ते आपले सेलिब्रिटी आहेत', असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.



'मी एवढी गर्दी कधी पाहिली नाही!' - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारावले


सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रेकॉर्ड ब्रेक बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. या शर्यतीला शिंदे यांच्यासह माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. या भव्य कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महिला बैलगाडा शर्यत हे ठरले. महिलांनी उत्साहाने सहभाग घेतलेला हा थरार पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शर्यतीच्या आयोजनाचे आणि बैलगाड्यांना मिळालेल्या प्रतिसादाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, "आज येथे धुरळा उडाला आहे. रेकॉर्ड ब्रेक बैलगाडी शर्यत या ठिकाणी भरवली आहे." शिंदे यांनी गर्दीचा उल्लेख करत बैलांना थेट 'सेलिब्रिटी' असे संबोधले. त्यांनी पुढे म्हटले, "एखाद्या फिल्मस्टारला जेवढी गर्दी होत नाही, तेवढी गर्दी माझ्या या लाडक्या बैलांना पाहण्यासाठी येथे झाली आहे. मी एवढी गर्दी कधी पाहिली नाही. ज्या बैलांनी भाग घेतला आहे, ते आपले सेलिब्रिटी आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या विधानामुळे बैलगाडा शर्यतीला केवळ क्रीडा प्रकाराचा नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्वाचा दर्जा मिळाला आहे.

Comments
Add Comment

पुणे महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल आंदेकर; प्रभाग २३ मध्ये धंगेकरांना धक्का

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधून एक वेगळाच राजकीय निकाल समोर आला आहे. नाना पेठ आणि

Pune Andekar Family : सूनेनंतर सासूनेही मारलं मैदान ! पुण्यात लक्ष्मी आंदेकरचा थरारक विजय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मध्ये चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सूनेनंतर आता

Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालन्यातून विजयी, राजकीय पक्षांच्या दिग्गजांना चारली धूळ

जालना : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालांत जालन्यातून एक धक्कादायक आणि चर्चेचा निकाल समोर आला आहे. ज्येष्ठ

Pune Mahapalika Result : पुणे महापालिका निकाल : एकत्र येऊनही काका पुतण्याचं नुकसान, भाजप आघाडीवर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने स्पष्ट आघाडी घेत शहराच्या राजकारणात आपली ताकद दाखवून

जळगावकर म्हणतायत.. तुमची आमची भाजपा सर्वांची! भाजपचा हा नेता ठरला धुरंधर

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणात शतप्रतिशत विजय मिळवला आहे.

Solapur election result : सोलापुरात काँग्रेसचा सुफडा साफ; खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रभागात भाजपचा दणदणीत विजय

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकालात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती