दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट! दहशतवादी कटाचा संशय; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) सोमवारी सायंकाळी एका मोठ्या स्फोटाने हादरली. येथील ऐतिहासिक लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या (Red Fort Metro Station) गेट क्रमांक एकजवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये सायंकाळी साधारण ६ वाजून ४५ मिनिटांनी हा शक्तिशाली स्फोट झाला. या भीषण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दिल्लीत हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे.


स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, स्फोट झालेल्या कारसह आजूबाजूच्या आणखी तीन गाड्यांना लागलीच आग लागली आणि परिसर धुराने व्यापला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याची तर १५ जण जखमी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमी आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्फोटानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) सुमारे सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले.


?si=tn46B0b01LQi-BRh

ज्या ठिकाणी हा स्फोट झाला, ते ठिकाण लाल किल्ल्यापासून (Red Fort) केवळ ८०० मीटर अंतरावर आहे आणि हा भाग उच्च सुरक्षा (High Security Zone) असलेला तसेच नेहमी गजबजलेला असतो. विशेषतः सायंकाळच्या वेळी येथे पर्यटकांची आणि नागरिकांची मोठी गर्दी असते. नेमक्या याच वेळी हा स्फोट झाला.


या घटनेनंतर, खबरदारी म्हणून लाल किल्ला परिसर तातडीने रिकामा करण्यात आला असून, दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी परिसराचा ताबा घेतला आहे. स्फोटाचे नेमके स्वरूप आणि कारण काय आहे, याचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (NSG) वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.


गेल्या चार दिवसांत, म्हणजेच ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत आयसिसच्या चार दहशतवाद्यांना (ISIS Terrorists) मोठ्या प्रमाणात स्फोटकांसह अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटाकडे अत्यंत गंभीरपणे आणि दहशतवादी कटाच्या संशयाने पाहिले जात आहे. सुरक्षा यंत्रणा या सर्व शक्यतांच्या आधारावर कसून तपास करत आहेत. स्फोटामागील खरे कारण आणि सूत्रधार लवकरच समोर येतील, अशी अपेक्षा आहे.


Comments
Add Comment

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची