मंगळवारपासून डॉक्टरांचा आमरण उपोषणाचा इशारा

मुंबई :  मुंबईतील रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमधून निर्माण होणारा जैवरासायनिक कचरा संकलनाचे काम राज्य शासनाने एस. एम. एस. इंव्होक्लीन प्रा.लि. या कंपनीकडे दिलेले आहे. मात्र या कंपनीकडून डॉक्टरांकडून शासन-निर्धारित दरांपेक्षा जास्त शुल्क आकारणी, निकृष्ट सेवा आणि कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन होत असल्याचा गंभीर आरोप नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे करण्यात आला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून ११ नोव्हेंबर २०२५ पासून मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


शासनाने निश्चित केलेले जैवरासायनिक कचरा संकलनाचे दर न पाळता कंपनीकडून डॉक्टरांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याचा आरोप डॉक्टरांकडून केला जात आहे. कंपनीकडून कचरा उचलण्यात अनियमितता दाखवली जात असून काही दवाखान्यांत कचरा अनेक दिवस पडून राहतो, असे असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ योगेश भालेराव यांनी सांगितले. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून डॉक्टरांना धमकावणे, उद्धट वर्तन आणि सेटलमेंटच्या नावाखाली लाच मागण्याचे प्रकार घडत असल्याचे असोसिएशनने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. कंपनीकडे बृहन्मुंबई महानगरपालिका व शासनाकडून मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा आरोप डॉक्टरांमध्ये वाढत आहे. अतिरिक्त व गैरकायदेशीर शुल्क परत न केल्यास मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. कंपनीचे संचालक सौरभ शर्मा यांनी चर्चेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले असले तरी ते आजतागायत अमलात आणले गेलेले नाही.


डॉक्टर वर्गाची अनेक वर्षे फसवणूक होत आहे. जर त्वरित कार्यवाही झाली नाही, तर ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मंत्रालयासमोर आमरण
उपोषण करू.  - डॉ. अमोल आंबेकर, अध्यक्ष, नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन



डॉक्टर संघटनेच्या पाच ठोस मागण्या


एस एमएस इन्व्होक्लीन प्रा. लि. कंपनीच्या कामकाजाची सखोल चौकशी झाली पाहिजे, डॉक्टरांकडून केलेली अवाजवी शुल्क आकारणी तात्काळ परत करावी , मुंबईसाठी नवीन, पारदर्शक व उत्तरदायी जैवरासायनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात यावी, सदर कंपनीला दिलेले कंत्राट रद्द करणे आणि नवीन निविदा प्रक्रिया (टेंडर) लागू करावे.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या घरातील किचन क्विन कोण? सकाळच्या नाश्त्याला काय आहार करतात अमृता फडणवीस?

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा नेहमी

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ सविस्तर प्रकल्प अहवालासाठी प्रक्रिया सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी’

पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार प्रस्तावित

दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास होणार सुसाट मुंबई : पूर्व मुक्तमार्ग म्हणजेच इस्टर्न फ्रीवेच्या विस्तार करण्याचा

महाराष्ट्र हेच भारताचे ‘स्टार्टअप कॅपिटल’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही नावीन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची

ड्रोन दिसताच बोंबाबोंब करणारी शिउबाठा अखेर तोंडावर पडली

मुंबई : शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसराजवळ ड्रोन उडत असल्याचे आढळले. या