पुण्यापाठोपाठ हाय-प्रोफाइल 'नमाज'वादाने बंगळुरु विमानतळ हादरले! भाजपचा काँग्रेसवर 'सुरक्षे'वरून हल्लाबोल!

'अतिसंवेदनशील' ठिकाणी परवानगी मिळाली का? - विरोधी पक्षाचा सरकारला थेट सवाल


बंगळुरू: पुण्याच्या शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून उठलेला वाद शांत होत नाही तोच, आता कर्नाटकातून तसाच एक नवा आणि गंभीर मुद्दा समोर आला आहे. बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KIA International Airport) सार्वजनिक ठिकाणी काही व्यक्ती नमाज पठण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या 'हाय-प्रोफाइल' घटनेमुळे कर्नाटकमध्ये राजकीय तणाव वाढला असून, विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी काँग्रेस सरकारवर सुरक्षेच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.


व्हायरल व्हिडिओमध्ये जवळपास १० ते १२ व्यक्ती विमानतळाच्या टर्मिनल २ मधील आगमन गेट क्रमांक ३ जवळ नमाज अदा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी सीआयएसएफ (CISF) म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवानही जवळच उभे असल्याचे दिसत आहे. इंडियन एक्स्प्रेसनुसार ही घटना याच परिसरात घडल्याची माहिती आहे.



भाजपचा थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर निशाणा


हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच कर्नाटक भाजपने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री प्रियांक खर्गे यांना टॅग करून तीव्र आक्षेप नोंदवला. कर्नाटक भाजपचे प्रवक्ते विजय प्रसाद यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर प्रश्न उपस्थित केले.


"बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ वर हा सगळा प्रकार होऊ तरी कसा दिला गेला? मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मंत्री प्रियांक खर्गे, तुम्ही याची परवानगी दिली होती का? विमानतळाच्या अतीउच्च सुरक्षा व्यवस्थेमध्ये अशा प्रकारे नमाज पठण करण्याची पूर्वपरवानगी या व्यक्तींनी घेतली होती का?" असा थेट सवाल प्रसाद यांनी केला आहे.



सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप


विजय प्रसाद यांनी यावेळी राज्य सरकारच्या धोरणांवरही टीका केली. "प्रशासनाकडून पूर्वपरवानगी घेऊन काढण्यात येणाऱ्या पथसंचलनाला सरकार आक्षेप घेते आणि प्रतिबंधित ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारांकडे डोळेझाक का करते?" असे म्हणत त्यांनी काँग्रेस सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला. "या प्रकारामुळे अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत नाही का?" असा सवाल विचारत त्यांनी या घटनेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.



प्रार्थनेसाठी वेगळी जागा, तरी गेटजवळ नमाज!


विमानतळ परिसरातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, KIA च्या टर्मिनल २ मध्ये प्रार्थनेसाठी एक वेगळी जागा (Multifaith Prayer Room) उपलब्ध आहे. मात्र, संबंधित गटानं गेटच्या बाहेर सार्वजनिक जागेत नमाज पठण केल्याचे स्पष्ट होते. याप्रकरणी आतापर्यंत कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही. या संवेदनशील घटनेमुळे देशभरात सार्वजनिक ठिकाणी धार्मिक विधी करण्याच्या नियमांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

बिहार निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांवर उद्या मतदान

पाटणा : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २० जिल्यांतील १२२ विधानसभा जागांवर मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी

जम्मू-काश्मीरमध्ये २,९०० किलो स्फोटके जप्त!

दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश: दोन डॉक्टरांसह सात जणांना अटक श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी आंतरराज्यीय व

Gujarat News : गुजरात एटीएसची मोठी कारवाई! घातक विष 'रायसिन' तयार करणाऱ्या डॉक्टरसह तिघांना अटक

अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट उधळून लावत, चिनी एमबीबीएस

देशातील पहिला अत्याधुनिक एचपीसीएल रिफायनरी अंतिम टप्प्यात

या प्रकल्पामुळे बलोतरा आणि पाचपद्रा परिसराचा चेहरामोहरा बदलला सीमा पवार बाडमेर : हिंदुस्तान पेट्रोकेमिकल्स

चंद्रयान-२ पुन्हा चर्चेत; इस्राोने शेअर केली मोठी माहिती !

नवी दिल्ली : सहा वर्षांपूर्वी प्रक्षेपित झालेल्या चंद्रयान-२ बद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)

डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत असाल तर सावधान !

आम्ही जबाबदार नाही; सेबीचा सतर्कतेचा इशारा नवी दिल्ली  : बदलत्या काळानुसार सोन्यातील गुंतवणुकीच्या