‘साज़-ए-गझल’: सुरांचा आणि शब्दांचा हृद्य अनुभव

गझल... म्हणजे नुसते शब्द नव्हेत, ती आहे प्रत्येक भावना शब्दांत गुंफण्याची कला! विरह, प्रेम, जीवन आणि आत्मचिंतन यांना सुरांनी दिलेले एक हळुवार आलिंगन म्हणजे गझल. याच हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण गझलांचा बहारदार नजराणा घेऊन नाट्यझंकार प्रॉडक्शन्स निर्मित 'साज़-ए-गझल' हा हिंदी आणि मराठी गझलांचा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचा 'शुभप्रारंभाच्या प्रयोग' शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे रात्री ८.३० वाजता होणार आहे.



या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गझलगायक निनाद आजगांवकर, दत्तप्रसाद रानडे आणि गायिका संगीता मेळेकर हे आपल्या जादुई आवाजाने गझलांचा झंकार निर्माण करणार आहेत. कार्यक्रमाच्या ओघवत्या निवेदनाची धुरा प्रसिद्ध कलाकार अभिजीत खांडकेकर आणि चेतना भट यांनी सांभाळली आहे. या संपूर्ण सादरीकरणाची संहिता समीरा गुजर यांनी लिहिली आहे, तर निर्मितीची बाजू माधुरी मिलिंद जोग यांनी सांभाळली आहे. या सांगीतिक मैफलीला अजय मदन यांच्यासह प्रशांत ललीत, प्रसाद पाध्ये, प्रथमेश साळुंके आणि संदेश कदम यांची साथ संगत मिळणार आहे. शीतल तळपदे यांची प्रकाश योजना आणि मंगल केंकरे यांची वेशभूषा कार्यक्रमाला अधिक आकर्षक बनवणार आहे.

Comments
Add Comment

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी, प्रभावी आणि दर्जेदार अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा सचित पाटील

‘१२० बहादूर’चा जबरदस्त ट्रेलर

सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या ‘१२० बहादूर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या

शो मस्ट गो ऑन...

टर्निंग पॉइंट - युवराज अवसरमल दाक्षिणात्य मातृभाषा असून देखील मराठी मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे

काव्यात रंगलेले ‘कुटुंब’ आणि प्रयोगातला ‘तो बॉक्स’...!

राजरंग - राज चिंचणकर कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कवितांचा कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातल्या गावोगावी भ्रमंती

दिग्दर्शक देखील उपेक्षितच असतो

पाचवा वेद - भालचंद्र कुबल हल्ली पाचवा वेद छापून आला आणि तो समाज माध्यमातून व्हायरल झाला की फोन यायला सुरुवात

राम चरणच्या अंदाजात आणि ए.आर. रहमानच्या सुरावटीची जादू; ‘पेड्डी’चं पहिलं गाणं ‘चिकिरी चिकिरी’ प्रदर्शित!

राम चरणच्या आगामी पेड्डी चित्रपटाबद्दल वाढत्या उत्सुकतेदरम्यान आता त्याचं पहिलं गाणं चिकिरी चिकिरी प्रदर्शित