प्रतिनिधी: वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सिंगापूर आणि कॅनडामधील अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्टअप्सनी भारतात विस्तार करण्यास रस दाखवला आहे. भारतात प्रचंड मोठी असलेली बाजारपेठ, जलद आर्थिक वृद्धी आणि सहाय्यक स्टार्टअप इकोसिस्टमचा पाठिंबा यामुळे या देशातील अनेक स्टार्टअप भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत.हाँगकाँग सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क्स कॉर्पोरेशन (HKSTP) द्वारे आयोजित केलेल्या जागतिक पिच स्पर्धेच्या EPIC 2025 च्या निमित्ताने वृत्तसंस्थेशी संवाद साधताना स्टार्टअप्सनी भारतीय बाजारात गुंतवणूक करण्यासाठी त्यांचा हेतू व्यक्त केला आहे. ७० हून अधिक अर्थव्यवस्थांमधून आलेल्या १२०० अर्जांपैकी, भारतातील १०० स्टार्टअप्सना डिजिटल हेल्थ टेक, फिनटेक आणि ग्रीनटेक या तीन श्रेणीतील गुंतवणूकदारांना कार्यक्रमादरम्यान निवडण्यात आले आहे. वार्षिक कार्यक्रमात संस्थापकांना जागतिक गुंतवणूकदार, कॉर्पोरेट भागीदार तसेच उदयोन्मुख बाजारपेठांशी जोडण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.
याविषयी माध्यमांना दिलेल्या निवेदनात, एचकेएसटीपी (HKSTP) चे अध्यक्ष सनी चाय म्हणाले आहेत की,'आम्ही हाँगकाँगच्या कनेक्टिव्हिटीला गतीमध्ये बदलत आहोत, ज्यामुळे कल्पना सीमा ओलांडून पुढे जाण्यास आणि विस्तारण्यास मदत होते.EPIC २०२५ हे याचे एक उदाहरण आहे,जिथे उद्योजक उदयोन्मुख बाजारपेठा, उत्साही गुंतवणूकदार आणि जागतिक दर्जाच्या नवोन्मेष परिसंस्थांशी (Innovative Ecosystem) जोडले जातात.'
याविषयी बोलताना, सिंगापूरस्थित NEU बॅटरी मटेरियल्सचे संस्थापक आणि सीईओ ब्रायन ओह म्हणाले आहेत की,'आमचे प्राधान्य सिंगापूरच्या पलीकडे आमचा व्यवसाय वाढवणे आहे, कारण बॅटरी रिसायकलिंग ही केवळ सिंगापूर किंवा हाँगकाँगची समस्या नाही, तर ती एक जागतिक समस्या आहे. आम्हाला आमच्या प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ती सोडवायची आहे.'भारतासाठीच्या योजनांबद्दल विचारले असता, ते म्हणाले आहेत की भारत हा स्टार्टअप्ससाठी एक मोठी बाजारपेठ आहे आणि बॅटरी रिसायकलिंगमध्ये सहभागी असलेले काही स्टार्टअप्स तेथे चांगले काम करत आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि तीन चाकी वाहने आहेत.ही निश्चितच एक बाजारपेठ आहे ज्याकडे आम्ही पाहत आहोत (बॅटरी रिसायकल करण्यासाठी).मला भारतातील सरकारी उपक्रम आणि धोरणांबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल' असे ग्रीनटेक श्रेणीत सहभागी झालेल्या ईपीआयसी (EPIC) २०२५ विजेत्याने सांगितले.
बेली येथील उत्पादन अभियंता जेडेन लू म्हणाले आहेत की,'भारत ही एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि या प्रवासाचा भाग असणे खूप चांगले असेल.त्यांनी पुढे सांगितले की, भारत कोणत्याही गुंतवणूकदारासाठी त्यांचा ग्राहक आधार तयार करण्यासाठी एक उत्तम संधी आहे, कारण त्याची लोकसंख्या जास्त आहे. देशात एक मोठा स्टार्टअप पाया आहे. मला भारतात स्टार्टअप्ससाठी उत्तम भविष्य दिसते' लू म्हणाले. एअरलाइन्ससाठी एअर कार्गो सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या सिंगापूरस्थित बेलीने EPIC २०२५ मध्ये फिनटेक श्रेणीत भाग घेतला.
कॅनडास्थित केए इमेजिंगचे अध्यक्ष आणि सीईओ अमोल एस कार्निक म्हणाले आहेत की,'आम्ही भारतात प्रवेश करण्याच्या शक्यतांचा शोध घेत आहोत, आम्हाला तेथे कामाला गती देण्यासाठी योग्य भागीदार, गुंतवणूकदार शोधण्याची आवश्यकता आहे.' स्टार्टअप्ससाठी भारत सरकारच्या धोरणांबद्दल त्यांचे मत मांडताना ते म्हणाले आहेत की,'अलीकडेच, आम्ही भारत सरकारने विज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञानात निधी गुंतवताना पाहिले आहे. ही आमच्यासाठी एक मनोरंजक संधी आहे. निधी सर्वात महत्वाचा आहे. धोरणे आपल्याला कशी मदत करू शकतात याचा मला अधिक शोध घ्यायचा आहे.'
हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित आजारांचे लवकर निदान करण्यासाठी मानवी अवयवांच्या रिअल-टाइम प्रतिमांसाठी रंगीत एक्स-रे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या केए इमेजिंगने EPIC २०२५ मध्ये हेल्थटेक श्रेणीमध्ये भाग घेतला होता.