ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?


ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात शेवटचा सामना आज म्हणजेच शनिवार ८ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडिय खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपासून सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या क्रीडा वाहिन्यांवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार या मोबाईल अॅपवर होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत मालिका ३-१ अशी जिंकणार आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनचा सामना जिंकल्यास मालिकेत ते २-२ अशी बरोबरी साधतील. यामुळे ब्रिस्बेनमध्ये काय होणार याविषयीची उत्सुकता वाढली आहे.



मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने चार विकेट राखून जिंकला. यानंतर भारताने तिसरा सामना पाच विकेट राखून आणि चौथा सामना ४८ धावांनी जिंकला. आता ब्रिस्बेनमध्ये जिंकून टी ट्वेंटी मालिका खिशात टाकण्याचा प्रयत्न भारतीय क्रिकेटपटू करतील.



भारतीय संघ: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, हर्षित कुमार रेड्डी



ऑस्ट्रेलिया संघ: मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, महली बियर्डमन



भारत - ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिका २०२५


पहिला सामना - मनुका ओव्हल, कॅनबेरा - पावसामुळे रद्द


दुसरा सामना - मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न - ऑस्ट्रेलिया चार विकेट राखून विजयी


तिसरा सामना - बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट - भारत पाच विकेट राखून विजयी


चौथा सामना - कॅरारा ओव्हल, क्वीन्सलँड - भारत ४८ धावांनी विजयी


पाचवा सामना - द गाबा, ब्रिस्बेन


Comments
Add Comment

बीसीसीआयच्या आदेशामुळे KKR ने मुस्तफिजूरला सोडल, ९.२० बसणार फटका ?

मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बीसीसीआयच्या

वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास

बेनोनी : दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील

युवा भारताचा द. आफ्रिकेवर विजय

बेनोनी : पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा वापर करून लावण्यात आलेल्या निकालात, भारतीय १९

केकेआरच्या ताफ्यातून मुस्तफिझूर रहमानची एक्झिट

मुंबई : भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम इंडियन प्रीमियर लीग २०२६ वर झाला आहे.

न्यूझीलंड विरूद्धच्या वन डे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने न्यूझीलंड विरूद्धच्या वन डे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत आणि

Hardik Pandya Century : पांड्या इज बॅक! ६ चेंडूत ३४ धावा अन् करिअरमधील पहिलं वादळी शतक; पाहा धडाकेबाज शतकाचा Video

राजकोट : भारतीय क्रिकेट संघ आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी सज्ज होत आहे. या मालिकेसाठी संघ