अक्षर पटेलची दमदार कामगिरी ! विराट आणि ख्रिस गेलशी बरोबरी

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर रंगला. या सामन्यात भारतीय संघाने 48 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आणि मालिकेतील पराभवाचा धोका दूर केला. या विजयात अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा मोलाचा वाटा होता. फलंदाजीत त्याने नाबाद 21 धावा केल्या, तर गोलंदाजीत दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.


या शानदार कामगिरीमुळे अक्षरला सामनावीराचा किताब मिळाला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हा त्याचा तिसरा सामनावीर पुरस्कार आहे. यासह, अक्षरने विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तिघेही आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सामनावीर ठरलेले खेळाडू ठरले आहेत.


सामन्यानंतर अक्षर म्हणाला, “सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना मला विकेट समजली. फलंदाजांशी बोलल्यावर जाणवलं की चेंडू वेगाने येत नव्हता, त्यामुळे विकेट थोडी मंद होती. म्हणूनच मी माझ्या शैलीत फलंदाजी केली आणि गोलंदाजीत फलंदाजांना संधी न देता विकेट-टू-विकेट लांबी राखण्याचा प्रयत्न केला.” आता टीम इंडिया या मालिकेचा निर्णायक आणि शेवटचा सामना 8 नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळणार आहे.

Comments
Add Comment

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

असं चकवलं कांगारुंना, शिवम दुबेने दिली माहिती

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने

जसप्रीत बुमराहचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२०

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी 'कांगारुं'चा उडवला धुव्वा!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे पारडे जड ; मालिकेत २-१ ने आघाडी; वॉशिंग्टनच्या फिरकीची जादूने ८ चेंडूत ३ बाद कॅरारा :

कॅप्टन सूर्या चौथ्या सामन्यात मोठा निर्णय घेणार ? उपकर्णधार शुभमन गिलची जागा धोक्यात!

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेचा चौथा सामना गुरुवारी, ६ नोव्हेंबर रोजी

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये निर्णायक सामना, टीम इंडिया सामन्यासाठी सज्ज

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ५ सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर मात करत तिसऱ्या टी