पुढील पर्याय फक्त युद्ध असेल, अफगाणिस्तान पाकिस्तान वादावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे निर्वाणीचे वक्तव्य

पाकिस्तान: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धस्थितीवर आज तुर्कीमध्ये उच्चस्तरीय चर्चा पुन्हा सुरू होणार आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी युद्ध चिघळण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.


माध्यमांशी बोलताना आसिफ म्हणाले, "जर चर्चा अयशस्वी झाली तर परिस्थिती आणखी बिकट होईल. आमच्याकडे पर्याय आहेत. आम्हाला ज्या पद्धतीने लक्ष्य केले जात आहे त्याच पद्धतीने आम्ही प्रतिसाद देऊ शकतो." हा पर्याय म्हणजे युद्ध का? असे विचारले असता, आसिफ यांनी "हो... फक्त युद्ध." असे सांगितले.


दोन्ही देशांमधील वाढत्या संघर्षांवर आतापर्यंत दोन वेळा चर्चा करण्यात आली आहे. मात्र शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे आतापर्यंतचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. आजवर झालेल्या चर्चेतून दोन महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. एक तर अमेरिका अफगाणिस्तानात ड्रोन हल्ले करण्यासाठी पाकिस्तानी हवाई क्षेत्राचा वापर करत आहे. दुसरे म्हणजे, अफगाण तालिबान अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की, फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्य पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारला बाजूला ठेवून काबुलशी तणाव वाढवत आहे.




अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीला पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर उपस्थित होते. दोन देशांचे नेते भेट असताना तिथे लष्करप्रमुख का होते असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानातील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या बग्राम एअरबेसवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नियंत्रण मिळवू इच्छित असताना अफगाण तालिबानचे हे दावे आणि पाकिस्तानी लष्करी वर्तुळाच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या तणावपूर्ण वातावरणात, आज तुर्कीमधील चर्चा खूप महत्त्वाची मानली जात आहे. कारण जर ही चर्चा अयशस्वी झाली तर पाकिस्तानी मंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे, 'पुढील पर्याय फक्त युद्ध असेल!'

Comments
Add Comment

‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे

इजिप्तमध्ये सापडले तीन हजार वर्षांपूर्वीचे ‘सोन्याचे शहर’

उत्खननात सोने वितळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भट्ट्यांचा समावेश कैरो : जगभरातील

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून पाकिस्तानमधील चमन आणि

अमेरिकेसाठी होणार सोशल मीडिया खात्यांची तपासणी; १५ डिसेंबरपासून नियम

न्यूयॉर्क : अमेरिकेत जायचे असेल, तर सोशल मीडियावर जपून पोस्ट करणे गरजेचे आहे. कारण, अमेरिकन व्हिसा मिळवताना सोशल

'बब्बर खालसा'ला ब्रिटन सरकारचा दणका

लंडन  : खलिस्तानवादी दहशतवादी संघटना बब्बर खालसाच्या आर्थिक नाड्या आवळल्यास ब्रिटन सरकारने सुरुवात केली. या

ट्रम्प प्रशासनाचे नवे धोरण अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी गैरसोयीचे

वॉशिंग्टन डीसी : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन हे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अनेक