थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. थंड वारे, कोरडी हवा आणि स्क्रीनसमोर वाढलेला वेळ या सगळ्यांचा परिणाम थेट डोळ्यांवर होत असून डोळे कोरडे पडणे, लालसरपणा, चुरचुरणे आणि दृष्टी धूसर होणे या तक्रारी वाढू शकतात.


हिवाळ्याच्या मोसमात अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्यामुळे थंडी काहीशी लांबली आहे. मात्र थंडीच्या दिवसात डोळ्यांची काळजी तितकीच महत्त्वाची आहे. या काळात हवेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. यासाठी घरात ह्यूमिडिफायर वापरणे, पुरेसे पाणी पिणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आर्टिफिशियल टिअर्स (कृत्रिम अश्रू) वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.


कोरड्या हवेमुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते


''थकवा आणि झोपेअभावी डोळ्यांत कोरडेपणा येतो. दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घेतल्यास डोळ्यांना विश्रांती मिळते आणि ते ताजेतवाने राहतात. डोळ्यांत खाज, लालसरपणा, पाणी येणे किंवा दृष्टी धूसर होणे या तक्रारी वाढल्यास स्वउपचार न करता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.'' - डॉ. शुभांगी अंबाडेकर (नेत्रतज्ज्ञ सिव्हिल रुग्णालय ठाणे)




काय काळजी घ्याल :


बाहेर पडताना डोळ्यांवर थंड वाऱ्याचा आणि धुळीचा थेट परिणाम होतो. त्यामुळे सनग्लासेस किंवा संरक्षणात्मक चष्मा वापरणे आवश्यक आहे. हे डोळ्यांना थंडी, धूळ आणि तीव्र प्रकाशापासून बचाव करत असल्याची माहिती सिव्हिल रुग्णालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.


गाजर, पालक, बदाम, अक्रोड आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असलेले पदार्थ डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.


व्हिटॅमिन ए, सी आणि ई यांचा पुरवठा केल्यास दृष्टीसंबंधी त्रास कमी होऊ शकतो.


 प्रत्येक २० मिनिटांनी २० सेकंद स्क्रीनपासून दूर पाहण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्यास डोळ्यांवरील ताण कमी होतो.


Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि