मुंबई मेट्रोची तिकिटे मिळणार थेट ‘उबर ॲप’वरून

मुंबई : उबरने प्रथमच मुंबईमध्ये मेट्रो तिकिटिंग सुरू केली असून, आता मेट्रो लाईन १ (वर्सोवा-घाटकोपर)ची तिकिटे थेट उबर ॲपवर उपलब्ध आहेत. यावर्षी दिल्ली आणि चेन्नईमध्ये यशस्वी सेवेनंतर हा उपक्रम मुंबईत राबवण्यात आला आहे.आता वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावरील प्रवाशांना उबर ॲपमध्येच तिकीट शोधणे, खरेदी करणे आणि वापरणे शक्य झाले आहे. ॲपमधूनच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत असल्याने प्रवाशांना तिकीट काऊंटरवरील रांगा आणि तिकिटिंगचा त्रास टाळता येणार आहे. हा उपक्रम उबेर मुंबई मेट्रो वन आणि ओएनडीसी नेटवर्क यांच्या सहकार्याने राबवण्यात आला आहे.


“मुंबईत उबर ॲपवर मेट्रो तिकीट उपलब्ध झाल्याने प्रवाशांना कमी प्रतीक्षा, कमी त्रास आणि अधिक सोयीचे ठरणार आहे. शहरी प्रवास पूर्णपणे 'एंड-टू-एंड' प्लॅनिंगपासून पेमेंट आणि प्रत्यक्ष प्रवासापर्यंत करण्याच्या ध्येयातील हे आणखी एक पाऊल असून त्याचबरोबर शहराच्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाढत्या जाळ्यालाआणखी बळकटी मिळणार असल्याचे शिवा शैलेन्द्रन, डायरेक्टर-कन्झ्युमर ग्रोथ, उबर इंडिया म्हणाले.


दिल्ली आणि चेन्नईनंतर,आता मुंबईकरांसाठी उबरवर इन-ॲप मेट्रो तिकीटिंग उपलब्ध करून देताना आम्हाला उत्साहित असून यामुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी ओपन डिजिटल इकोसिस्टम आणखी मजबूत होणार असल्याचे ओएनडीसीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक नितिन नायर यांनी सांगितले. मेट्रो तिकीटांसाठी पेमेंट फक्त यूपीआयमार्फतच स्वीकारले जाणार आहे. तिकिटिंग व्यतिरिक्त, उबर ॲपवर लवकरच रिअल-टाईम सेवा अपडेट्स, स्टेशन माहिती आणि मार्ग नियोजन साधने उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना प्रवास अधिक सुटसुटीत आणि नियोजनबद्ध होईल. लाईन १ तिकिटिंगचा हा शुभारंभ उबरच्या मल्टी-मॉडल ट्रॅव्हलला अधिक सोपे, जलद आणि परस्पर जोडलेले बनवण्याच्या व्यापक प्रयत्नांमधील आणखी एक पाऊल आहे. यामुळे अधिकाधिक मुंबईकर सार्वजनिक वाहतुकीसोबत उबरच्या सोयींचा लाभ घेऊ शकतील.

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे