मुंबई आशियातील 'आनंदी' शहर!

टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश


नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून टाइम आऊटने केलेल्या एका नवीन सर्वेक्षणातून प्रथम स्थान मिळाले आहे. सांस्कृतिक चैतन्य, खाद्यसंस्कृती, नाईट लाईफ आणि जीवनाची गुणवत्ता या घटकांवर आधारित हे सर्वेक्षण होते. या यादीत बीजिंग आणि शांघाय अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.


या सर्वेक्षणात १८,००० हून अधिक लोकांनी प्रतिसाद दिला. मुंबईतील ९४ टक्के रहिवाशांनी शहर आनंदी असल्याचे सांगितले आणि ८९ टक्के लोकांनी 'इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा आम्ही येथे अधिक आनंदी आहोत' असा दावा केला.
तसेच, सुमारे ८७ टक्के लोकांनी शहरातील आनंद निर्देशांक अलिकडच्या वर्षांत वाढला असल्याचे मत व्यक्त केले.


चीनमधील बीजिंग आणि शांघाय येथील ९० टक्क्यांहून अधिक सहभागींनी त्यांच्या राहणीमानावर समाधान व्यक्त केले आहे. दुसरीकडे, जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या टोकियोसारख्या पूर्वेकडील आशियाई शहरांनी आनंदाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. टोकियोमध्ये केवळ ७० टक्के लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.



आशियातील टॉप १० आनंदी शहरे


१. मुंबई
२. बीजिंग
३. शांघाय
४. चियांग माई
५. हनोई
६. जकार्ता
७. हाँगकाँग
८. बँकॉक
९. सिंगापूर
१०. सोल

Comments
Add Comment

गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क

उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम

अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले

मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :

बीडीडीतील ८४६ रहिवाशांना आठवड्याभरात मिळणार घरे

पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार मुंबई : बीडीडी चाळीतील रहिवाशांना गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वरळीतील

जे निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीवर बोलणार; नमो केंद्रावरून राजकीय वादंग!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवं वादळ उठलंय. प्रश्न हा आहे की, फक्त तोडण्याची भाषा करणाऱ्यांना