'टीईटी परिक्षेबाबत अफवांवर विश्वास नको'

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२५ परीक्षचे आयोजन रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. याबाबत सर्व संबंधितांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. परीक्षेसंबंधी कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) च्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती देण्यात येते. तथापि, परीक्षेसंबंधी यूट्यूब चॅनेल्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे व प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या/ अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. परीक्षेसंबंधी कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार/ विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

मुंबई : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क

मुख्यमंत्री असताना कधी घराबाहेर पडले नाही, पराभवानंतर आता लोकांमध्ये जाण्याची जाणीव झाली!

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांचे धारदार टीकास्त्र नागपूर : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या

राज ठाकरे संतापले; निष्क्रिय शाखाध्यक्षांना थेट काढून टाकण्याचे आदेश

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कमालीचे संतप्त

मुख्यमंत्री फडणवीसांकडून 'ॲक्शन' : पार्थ पवारांच्या कंपनीवरील जमीन घोटाळ्याची चौकशी सुरू; तहसीलदार निलंबित!

कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात मोठी घडामोड; 'या' अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई मुंबई : उपमुख्यमंत्री

Sambhajinagar Younger Viral Video : संभाजीनगर नामफलकाखाली लघुशंका करणे जीवावर बेतले; धमक्यांना कंटाळून तरुणाची विहिरीत उडी!

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे झालेल्या सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला

राज्यावर पावसाचं संकट कायम ; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : एरवी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडणे थांबते. पण यंदा नोव्हेंबर महिना आला तरी राज्यातच नाही तर देशातही