देशातील सर्वात मोठी पीएसयु बँक एसबीआय आयपीओद्वारे ३२०६०००० इक्विटी शेअर्स विकणार !

मुंबई: गुरुवारी एसबीआयने आपले ६.३०% भागभांडवल म्हणजेच ३२०६०००० इक्विटी शेअर एसबीआय फंड मॅनेजमेंटमधून विकण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या आधीच्या नियामक फाइलिंगनुसार, त्यांचे देशांतर्गत निव्वळ व्याज मार्जिन (Net Interest Margin NII) ३.०९% घसरले आहे जे गेल्या वर्षीच्या ३.२७ % १८ बेसिस पॉइंट्सने कमी आहे. मात्र हे समभाग हिस्सा (Stake) विकल्याने बँकेला अतिरिक्त तरलता (Liquidity) प्राप्त होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आयपीओद्वारे एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेड (एसबीआयएफएमएल) च्या एकूण इक्विटी भांडवलाच्या ३२०६०००० इक्विटी शेअर्स किंवा ६.३००७ टक्के विकण्याची घोषणा केली.याव्यतिरिक्त, एसबीआयएफएमएलची दुसरी प्रवर्तक (Second Promoter) अमुंडी इंडिया होल्डिंग १८८३०००० इक्विटी शेअर्स विकणार आहे, जे एसबीआयएफएमएलच्या एकूण इक्विटी भांडवलाच्या ३.७००६% इतके असेल. माहितीनुसार या आयपीओत एकूण १०.००१३% हिस्सा म्हणजे ५०८९०००० शेअर्स सूचीबद्ध केले जातील, असे स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार स्पष्ट केले गेले आहे.


'एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेड (एसबीआयएफएमएल) ही एसबीआय कार्ड्स आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स नंतर सूचीबद्ध होणारी एसबीआयची तिसरी उपकंपनी असेल. याविषयी बोलताना,'एसबीआयएफएमएलची गेल्या काही वर्षांमध्ये कायम स्वरूपी मजबूत कामगिरी आणि बाजारातील नेतृत्व लक्षात घेता, आयपीओ प्रक्रिया सुरू करण्यासाठी हा एक योग्य वेळ मानला जात आहे' असे एसबीआयचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी म्हणाले. विद्यमान भागधारकांसाठी मूल्य प्राप्ती वाढवण्याव्यतिरिक्त, आयपीओ सामान्य भागधारकांसाठी संधी निर्माण करेल, बाजारातील सहभाग वाढवेल आणि संभाव्य गुंतवणूकदारांच्या विस्तृत गटात उत्पादनांबद्दल जागरूकता वाढवेल, असेही त्यांनी सांगितले.


एसबीआयएफएमएलच्या दोन्ही प्रवर्तकांनी संयुक्तपणे आयपीओ सुरू केला आहे जो २०२६ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे भारतातील सर्वात मोठ्या बँक एसबीआयने दाखल केलेल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे.


अमुंडीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व्हॅलेरी बॉडसन म्हणाल्या आहेत की,'गेल्या काही वर्षांत, एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडने भारतातील मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात स्वतःला आघाडीवर म्हणून स्थापित केले आहे.' भारतात एसबीआयच्या नेटवर्कच्या शक्तिशाली वितरण क्षमतेचा आणि मालमत्ता व्यवस्थापनातील अमुंडीच्या जागतिक कौशल्याचा फायदा घेत, ते यशस्वीरित्या वाढले आहे. यापूर्वी, 'एसबीआयने आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत वार्षिक आधारावर ६.४% वाढ नोंदवली होती जी २१५०४.४९ कोटी होती, गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ही २०२१९.६२ कोटी रुपये होती.' असे म्हटले गेले आहे.


मिळालेले व्याज आणि दिलेले व्याज किंवा बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Margin NII) यातील फरक मागील वर्षाच्या याच तिमाहीत ४१६२० कोटी रुपयांवरून ३.२८% वाढून ४२९८४ कोटी रुपये झाला आहे. त्यांच्या पूर्वीच्या नियामक फाइलिंगनुसार, त्यांचे देशांतर्गत निव्वळ व्याज मार्जिन (NIM) ३.०९% घसरले, जे गेल्या वर्षीच्या ३.२७% पेक्षा १८ बेसिस पॉइंट्सने कमी आहे.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

पुणे महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल आंदेकर; प्रभाग २३ मध्ये धंगेकरांना धक्का

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधून एक वेगळाच राजकीय निकाल समोर आला आहे. नाना पेठ आणि

Pune Andekar Family : सूनेनंतर सासूनेही मारलं मैदान ! पुण्यात लक्ष्मी आंदेकरचा थरारक विजय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मध्ये चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सूनेनंतर आता

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या