छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काल (४ नोव्हेंबर) सायंकाळी मेमू ट्रेनचा आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा मोठा होता की, मेमू ट्रेनचा एक डब्बा मालगाडीवर चढला. ज्यात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी आहेत. या अपघाताची कारणे शोधण्यासाठी रेल्वेकडून तपास करण्यात आला आहे.
छत्तीसगडमध्ये झालेल्या अपघाताबद्दल तपास करताना मेमू ट्रेनने सिग्नल तोडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. रेल्वेच्या ऑपरेशन विभागाच्या मते, जेव्हा ट्रेन बिलासपूर स्टेशनजवळ आली तेव्हा एक मालगाडी आधीच विरुद्ध मार्गावर उभी होती. मेमू ट्रेन चालकाने सिग्नलवर गाडी न थांबवता थेट पुढे आणली. यामुळे हा अपघात झाल्याचे मानले जात आहे.
मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील स्वच्छता ही आता चिंतेचा विषय ठरला आहे. कुपर रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे महापालिका ...
दरम्यान सिग्नल ओव्हरशूट तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकीमुळे याचा तपास सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मेमू गाड्यांमध्ये आधुनिक सिग्नलिंग आणि ब्रेकिंग सिस्टीम आहेत, त्यामुळे अशा चुका दुर्मिळ होतात. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग आणि ब्रेकिंग सिस्टीम योग्यरित्या काम करत होती की नाही याची चौकशी सुरू आहे.